Dada Bhuse Agrowon
ॲग्रो विशेष

River Linking Project : नदीजोड प्रकल्पामुळे नवसंजीवनी : मंत्री दादा भुसे

Agriculture Irrigation : माळमाथा भागासाठी विशेष योजना राबविण्यात येत असून, गिरणा उजव्या व डाव्या कालव्याची वहनक्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे.

Team Agrowon

Nashik News : पिण्याच्या, सिंचन व औद्योगिक प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळणार आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.

येथील बालाजी लॉन्समध्ये रविवारी (ता. १५) मंत्री भुसे यांच्या उपस्थितीत नार-पार-गिरणा नदीजोड योजना सर्वेक्षण व अन्वेषण कामाची आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ उपस्थित होते.

भुसे म्हणाले, की गिरणा कालव्याच्या तालुक्यातील माध्यमातून पाण्याची समस्या सुटणार आहे. उद्योग व्यवसायासाठी देखील पाणी उपलब्ध होणार आहे. विविध धरणांची व बंधाऱ्यांच्या दुरुस्ती करण्यात आली असून नुतनीकरण केल्याचे त्यांनी सांगितले. अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने व कार्यकारी अभियंता मनोज डोके यांनी नार पार गिरणा नदी जोड योजनेची सविस्तर माहिती दिली.

प्रकल्पाच्या माध्यमातून नार-पार-औरंगा खोऱ्यातून १०,६४० द.ल.घ.फू. पाणी गिरणा खोऱ्यात उपलब्ध होईल. या योजनेचा विचार केला असता गिरणा धरणाच्या निम्मे व ४ चणकापूर धरणे भरतील एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच या प्रकल्पाद्वारे गिरणा उपखोऱ्यात पाणी वळवून सुरगाणा, कसमादे तसेच चाळीसगाव, भडगाव, एरंडोल या भागातील सुमारे १.२ लाख एकर क्षेत्रात सिंचन, पिण्याचे व औद्योगिक पाणी उपलब्ध होणार आहे.

माळमाथा भागासाठी विशेष योजना राबविण्यात येत असून, गिरणा उजव्या व डाव्या कालव्याची वहनक्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. जल वहन मार्गाअंतर्गत रावळगाव, अजंग लघू पाटबंधारे तलाव, वडेल बंधारा, मोसमसाळ कालवा, दहिकुटे व कान्होळी नदीमार्गे पाणी पोहोचविले जाणार आहे.

९ गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध तलाव, बंधारे व पाइपलाइनद्वारे माळमाथा धरण व त्याच्या परिसरातील गावांना पाणीपुरवठा होणार आहे. या प्रकल्पाचा लाभ सुमारे ६७ गावांना मिळणार असून शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे. यावेळी संकल्पनांचे काम मार्गी लावण्याचे, निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्याचे व प्रत्यक्ष कामास गती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

गिरणा कालव्यांचे नूतनीकरण

मंत्री भुसे म्हणाले, की जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा व मालेगाव तालुक्यांतील ३२ हजार ४९२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभहोणार आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात होणार असून, सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. प्रकल्पाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातील गिरणा उजवा व डावा कालव्याचे नूतनीकरण करून क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US trade : डोनाल्ड ट्रम्प यांचे आरोप भारताने फेटाळले; कमी दरात तांदूळ निर्यात नाही, भारताचे स्पष्टीकरण

FPO Scheme: शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीच्या केंद्रीय योजनेला आणखी पाच वर्ष मुदतवाढ मिळणार

Devendra Fadnavis: शिंदेंसोबत जास्तीत जास्त ठिकाणी युती, पुण्यात अजितदादांविरोधात लढू, फडणवीस काय म्हणाले?

Dairy Development: तेलंगणात विजया डेअरीचा विस्तार: दूध खरेदी आणि विक्री नेटवर्क वाढवण्याचा मोठा निर्णय

Cooperative Bank: ‘डीसीसी’ची शासकीय भांडवलावरच मदार

SCROLL FOR NEXT