Nano Urea, DAP Agrowon
ॲग्रो विशेष

Nano Urea, DAP : कापूस, सोयाबीनसाठी मिळणार नॅनो युरिया, डीएपी

Cotton : उत्पादकता, मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजनेच्या बाबींमध्ये बदल

Team Agrowon

Soybean News : कापूस, सोयाबीन आणि तेलबियांच्या उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजनेच्या प्रशासकीय मान्यता मिळाली तरी अपेक्षित खर्च झाला नव्हता. मात्र लोकसभा आचारसंहितेपूर्वी या कृती योजनेत नॅनो युरिया, डीएपी, कॉटन बॅग आणि गोगलगायीच्या प्रादुर्भावावरील कीडनाशकचा समावेश केला असून, उर्वरित ३४२ कोटी रुपये खर्चाचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसेच मूल्यसाखळी विकासासाठी नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. २०२३-२४ मध्ये कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या उत्पादकता वाढी आणि मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजनेकरिता ५२० कोटी ८६ लाख रुपयांच्या कार्यक्रमास ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली होती.

या कृती कार्यक्रमांतर्गत १७८ कोटी ८६ लाख रुपये खर्च झाले होते. उर्वरित ३४२ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता असली, तरी मार्चअखेर आर्थिक वर्ष संपणे आणि लोकसभा आचारसंहितेच्या अडसरामुळे हा निधी परत जाण्याची शक्यता होती. या कृती योजनेतील काही बाबींच्या बदलांसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे आग्रही होते.

तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा त्यास छुपा विरोध होता. त्यासाठी काही कारणेही त्यांनी दिली होती. अखेर हे प्रकरण थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेल्यानंतर बाब बदलाचा शासकीय आदेश काढण्यात आला.

या कृती योजनेतील विशेष बाब बदल केल्यानंतर आता सोयाबीनसाठी फुले येण्याच्या अवस्थेत नॅनो डीएपी ६०० रुपये प्रति ५०० मिलि पॅकसाठी, शेंगा लागण्याच्या अवस्थेत नॅनो युरिया २२५ रुपये प्रति ५०० मिलि पॅक, गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेटाल्डिहाइड कीटकनाशक ५०३१ रुपये प्रति पाच किलो देणार आहेत. तर एकूण २५० टन देणार आहेत. हे नॅनो युरिया, डीएपी फवारणीसाठी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी प्रतिपंप १५०० रुपये देण्यात येणार आहेत.

कापूस मूल्यसाखळी विकासात २६४ डिजिटल सॉइल मॉस्चर सेन्सर, कापसाला पात्या लागण्याच्या अवस्थेत व फुलोऱ्याच्या अवस्थेत ११ लाख ६० हजार नॅनो प्रति ५०० मिलि प्रतिपॅक देण्यात येणार आहे. तसेच ११.५० हजार नॅनो युरिया पात्या लागण्याच्या व फुलोऱ्यातील अवस्थेत प्रति ५०० मिलि प्रति पॅक देण्यात येणार आहेत.

कापूस साठवणुकीसाठी बॅग
ऐन कापसाच्या हंगामात दर पडल्याने अनेक शेतकरी कापूस काढून घरात साठवतात. दर वाढल्यानंतर हा कापूस विकला जातो. कित्येक महिने हा कापूस घरात राहिल्याने श्‍वसनयंत्राचे गंभीर आजार होत असल्याचे समोर आले आहे. यासाठी या योजनेअंतर्गत ६ लाख १८ हजार ३२ बॅग वाटप करण्यात येणार आहेत. यातील एका बॅगची किंमत १२५० रुपये आहे.

कापूस मूल्यसाखळीत असलेल्या बाबी
- नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे.
- अस्तित्वात असलेल्या शेतकरी गटांना संलग्न करून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे.
- कापूस साठवणुकीसाठी शेड.
- शेतावरील जिनींग आणि प्रक्रिया युनिट, ऑइल एक्स्ट्राक्टर.
- शेतकरी उत्पादक कंपन्यांचे मूल्यसाखळी बळकटीकरण करण्याकरिता प्रोत्साहन अनुदान.
- शेतकरी उत्पादक कंपन्यांना ड्रोन खरेदी व ड्रोनद्वारे कीटकनाशके फवारणी करण्यासाठी अनुदान व अर्थसाह्या.
- बांधावर जैविक निविष्ठा निर्मिती.
- मास्टर लॅब, बेसिक लॅब.
- शेतकरी उत्पादक कंपनी कमोडिटी मार्केटशी जोडण्याकरिता अर्थसाह्य.
- बियाणे साखळी बळकटीकरण.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT