Nano Urea Liquid Agrowon
ॲग्रो विशेष

Nano technology : ठोस संशोधन करून नॅनो तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

Fruit Orchard Update : फळबागा देशाच्या उत्पन्न, उत्पादनासाठी महत्त्वाच्या आहेत. पण त्यात काटेकोर, नियोजनबद्ध, उपजीविका भागविणाऱ्या आणि पोषणमूल्य प्रदान करणाऱ्या बागांची गरज आहे.

Team Agrowon

Jalgaon Fruit Orchard News : फळबागा देशाच्या उत्पन्न, उत्पादनासाठी महत्त्वाच्या आहेत. पण त्यात काटेकोर, नियोजनबद्ध, उपजीविका भागविणाऱ्या आणि पोषणमूल्य प्रदान करणाऱ्या बागांची गरज आहे.

नैसर्गिक आपत्ती समोर येत असून, त्यात देशाचे फलोत्पादन अडचणीत येत आहे. यासंबंधी ठोस संशोधन करून नॅनो तंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा, अशा शिफारशी जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत तज्ज्ञ, शास्त्रज्ञांनी मांडल्या.

रविवार (ता. २८) ते मंगळवार (ता. ३०) अशी तीन दिवस ही परिषद झाली. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि नवी दिल्ली येथील अमितसिंग फाउंडेशनतर्फे परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यात भारतीय कृषी संशोधन परिषद व इतर कृषी संस्थांच्या देशभरातील १०० संशोधक, शास्त्रज्ञांनी आपले शोधप्रबंध सादर केले.

तज्ज्ञांनी शेतीमालाच्या मूल्यवर्धनाबाबत विविध विषय तज्ज्ञांचे सादरीकरण झाले. मंगळवारी (ता. ३०) परिषदेचा समारोप झाला.

तांत्रिक सत्र सादरीकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. एच. पी. सिंग, को-चेअरमन एस. के. मलहोत्रा आणि डॉ. डी. एन. कुळकर्णी होते. सीआरआयचे डॉ. रमेश एस. व्ही. यांनी नारळाचे मूल्यवर्धन करणारे उत्पादने व शाश्‍वतता याबाबत सादरीकरण केले.

गुणवत्ता असेल, तर ग्राहक हव्या त्या किमतीला वस्तू विकत घेतात, असे नमूद केले. जैन इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी डॉ. डी. एन. कुळकर्णी यांनी फळे व भाजीपाला याविषयीचे मूल्यवर्धन व वास्तवता याबाबत सादरीकरण केले.

केळीवर मंथन

जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांनी केळी व त्याच्या मूल्यवर्धनाबाबत मोलाचे सादरीकरण केले. प्री आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटबाबत त्यांनी प्रकाशझोत टाकला.

भारतात इतर देशांच्या तुलनेने केळी लागवड क्षेत्र अधिक असूनही केळीची नगण्य निर्यात होते या बाबतच्या मुख्य कारणांवर चर्चा केली. इराण, यूएई, दक्षिण आफ्रिकेत भारतातून केळीची निर्यात होते ती निर्यात वाढण्याची संधी आहे, या बाबतचा विश्वास के. बी. पाटील यांनी व्यक्त केला.

समारोप सत्रात चाईचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग यांनी परिषदेतील निष्कर्ष, शिफारशी व अभ्यासाचे मुद्दे मांडले. त्यात शेतकरी नैसर्गिक आपत्तींना सतत तोंड देत आहे, यासंबंधी नॅनो तंत्रज्ञानावर संशोधकांनी काम करायला हवे, असे मुद्दे मांडण्यात आले. यानिमित्त देशातील २१ शेतकऱ्यांचा अमित उद्यान रत्न पुरस्काराने गौरव झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT