Amchur  Agrowon
ॲग्रो विशेष

Amchur Processing: आमचूर प्रक्रियेसाठी योजना, निधीची गरज

Tribal Development: खानदेशात आमचूरसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आमचूर प्रक्रिया उद्योगासंबंधी निधी अपुरा पडत आहे. नव्या सरकारने या हंगामात प्रक्रिया अधिकाधिक व तंत्रशुद्ध होण्यासह निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी तातडीने योजना व निधी आणावा, असा मुद्दा उपस्थित होत आहे.

Team Agrowon

Nandurbar News: खानदेशात आमचूरसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आमचूर प्रक्रिया उद्योगासंबंधी निधी अपुरा पडत आहे. नव्या सरकारने या हंगामात प्रक्रिया अधिकाधिक व तंत्रशुद्ध होण्यासह निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी तातडीने योजना व निधी आणावा, असा मुद्दा उपस्थित होत आहे.

मागील वर्षी शासनाने सुमारे सव्वाआठ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. यातून प्रशिक्षण व अन्य कार्यवाही केली. जिल्ह्यात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांत आमचूर प्रक्रिया उद्योग अधिक आहे. या भागातील सर्वच उद्योगांचे मजबुतीकरण, आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आहे. मागील वेळेस निधी देताना विविध टप्पे तयार करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात आमचूर प्रक्रिया उद्योगात कार्यरत महिला, गटांचे प्रशिक्षण झाले.

धडगाव, अक्कलकुवा भागांतील देशी किंवा पारंपरिक, गावठी प्रकारचे आमचूर देशभरात प्रसिद्ध आहे. त्यास विविध बाजारांत मोठी मागणी असते. धडगाव व अक्कलकुवा येथील आमचूरची बाजारपेठही सर्वत्र प्रसिद्ध आहे. या भागात प्रक्रिया उद्योगांची संख्याही वाढली आहे. परंतु या उद्योगास जागतिक स्तरावर संधी मिळावी, बाजारात चांगला उठाव तयार व्हावा, जगभरात तेथील उत्पादने पोहोचावीत यासाठी आदिवासी विकास विभागाने कार्यवाही हाती घेण्याची गरज आहे.

प्रशिक्षण व पुढे दर्जेदार पदार्थांची निर्मिती झाल्यास लाभ होईल. तसेच तंत्रशुद्ध प्रक्रियेने अधिक काळ टिकणारा, अधिक दिवसांच्या वाहतुकीसाठी टिकाऊ आमचूर तयार करता येईल. मध्यंतरी यासंबंधी आदिवासी क्षेत्रातील तीन हजार महिलांना प्रशिक्षण झाले.

या उद्योगाचा विस्तार, व्याप्ती यासाठी प्रक्रिया उद्योगासाठी साहित्य, सामग्रीदेखील आवश्यक आहे. त्यासाठी भरीव तरतूद करण्याची गरज आहे. सातपुडा भागात हा उद्योग असून, त्यासंबंधी आदिवासी विकास विभाग व स्थानिक प्रशासनाने समन्वय साधून कार्यवाही करावी, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Eating in Cows: जनावरांनी प्लास्टिक, खिळे खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या आवश्यक उपाय

Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक

Tur Prices: सोलापूर जिल्ह्यात तूर अन्‌ सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर!

Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT