Agriculture Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Solar Scheme : अकोला जिल्ह्यात १६ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज

Day-Time Electricity : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला जिल्ह्यात गती देण्यात आली असून महावितरणच्या बाळापूर उपविभागातील नांदखेडा सौर प्रकल्प सुरू झाल्यामुळे एकूण सौर ऊर्जानिर्मितीत ५ मेगावॉटने वाढ झाली आहे.

Team Agrowon

Akola News : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला जिल्ह्यात गती देण्यात आली असून महावितरणच्या बाळापूर उपविभागातील नांदखेडा सौर प्रकल्प सुरू झाल्यामुळे एकूण सौर ऊर्जानिर्मितीत ५ मेगावॉटने वाढ झाली आहे.

या प्रकल्पामुळे ३३ केव्ही कान्हेरी गवळी उपकेंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या १ हजार ११० शेतीपंपाला दिवसा आणि शाश्वत विजेची सोय झाली आहे. जिल्ह्यात आजवर कार्यान्वित झालेल्या एकूण सौर कृषी वाहिनीमुळे १६ हजार शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी अकोल्यात रेडावा (२ मेगावॉट) आणि भेंडीमहाल (१० मेगावॉट) या दोन सौर प्रकल्पांचे लोकार्पण झाले. बाळापूर तालुक्यातील नांदखेडा सौरप्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे जिल्ह्यात एकूण ११ सौर प्रकल्प सुरू झाले असून या प्रकल्पातून ५५ मेगावॉट वीज निर्मिती होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १६ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला दिवसा वीज मिळायला सरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरणकडून राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत विकेंद्रीत स्वरूपाचे सौरप्रकल्प उभारण्यात येत आहे. ऊर्जासचिव आभा शुक्ला आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांच्या मार्गदर्शनात राज्यात शासनाच्या आणि महावितरणची महत्वाकांक्षी असलेल्या या योजनेला गती देण्यात आली आहे.

मुख्य अभियंता राजेश नाईक आणि अधीक्षक अभियंता प्रतिक्षा शंभरकर यांच्या मार्गदर्शनात मेघा इंजिनिअरिंग या विकासकामार्फत पूर्ण करण्यात आलेला नांदखेडा सौर प्रकल्प कार्यकारी अभियंता गोरक्षणाथ सपकाळे, मदन नानोटकर यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आला. हा प्रकल्प २५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेला असून निर्मिती होणारी सौरऊर्जा ३३ केव्ही कान्हेरी गवळी उपकेंद्राच्या माध्यमातून कृषी वाहिनद्वारे १११० शेतकऱ्यांना दिवसा विजेची सोय झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

Sugar Production: देशात जुलैअखेर साखरेचे २५८ लाख टन उत्पादन

Agriculture Department: 'कृषी’तील बदल्यांचा सावळागोंधळ सुरू

Maharashtra Rain Update: विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

SCROLL FOR NEXT