Floriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Flower Farming : भविष्यात नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुलपिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

Team Agrowon

Nanded News : अलीकडच्या काळात शेतकऱ्यांनी इतर पिकांबरोबर निर्यातक्षम फुलपिके उत्पादकतेवर भर द्यावा. भविष्यात नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुलपिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात बुधवारी (ता. ३०) सहकार व पणन विभाग अंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी व आत्मा विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने फुलपिके उत्तम कृषी पद्धती या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहानकर, एमसीडीचे प्रशिक्षण विभाग प्रमुख दिगंबर साबळे, मॅग्नेट प्रकल्प लातूर विभागीय प्रकल्प उपसंचालक महादेव बरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा दत्तकुमार कळसाईत, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, प्रकल्प उपसंचालक मॅग्नेट लातूर महादेव बरडे, विभागीय प्रकल्प अधिकारी मॅग्नेट, भारतीय पुष्प अनुसंधान पुण्याचे शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम, केएफ बायो प्लांट्स पुणेचे तांत्रिक अधिकारी राजन निफाडकर, न्यू लीफ डायनामिक टेक्नॉलॉजीचे तांत्रिक अधिकारी विवेक वीर, शितलादेवी शेतकरी उत्पादक कंपनी बारडचे अध्यक्ष नीलेश देशमुख, हिरकणी बायोटेकचे रत्नाकर देशमुख, मॅग्नेट प्रकल्पाचे गजेंद्र नवघरे आदी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन बाजारपेठेचा अभ्यास, प्रक्रिया युक्त फुलपिकांच्या बाबी यासाठी संघटित होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच शेतीसह शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. उत्पादित केलेला पक्का शेतमाल निर्यात करण्याकडे भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

मॅग्नेट अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फुलपिके निर्यातीसाठी मॅग्नेट प्रकल्पांतर्गत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे महादेव बरडे यांनी सांगितले. फुलपिके निर्यातीसाठी आवश्यक ती सर्व मदत त्यासाठी लागणारी ऑनलाइन नोंदणी याविषयी कृषी विभाग मार्गदर्शन व मदत करेल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सांगितले. फुलपीक तंत्रज्ञानातील वाव व संधी याविषयी दिगंबर साबळे यांनी मार्गदर्शन केले.

हेमंत जगताप यांनी एमसीडीसीला लातूर विभागामध्ये फुलपिके प्रशिक्षण घेण्यासाठी मॅग्नेट प्रकल्पाने संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. खुल्या वातावरणातील फुलशेती लागवड तंत्रज्ञानातील विविध बारकावे डॉ. गणेश कदम यांनी समजून सांगितले.

संरक्षित शेती वातावरणातील फुलपिके तंत्रज्ञान याविषयी माहिती राजन निफाडकर दिली. बायोमास आधारित शीत साठवणूक तंत्रज्ञान यासंबंधी विवेक वीर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी नांदेडमधील ३५० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Price: देशात सोयाबीनच्या दरात सुधारणा

Banana Export: पिंप्री खुर्द गावातील केळीची परदेशात निर्यात

Agriculture Minister Bharane: शेतकऱ्यांना आनंदी करणारे कामकाज करू: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Farm Road: शेतरस्त्यांसाठी जमिनींचा ताबा

Papaya Market: खानदेशात पपई आवक वाढण्याचे संकेत

SCROLL FOR NEXT