Turmeric Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Farming: नांदेडच्या शेतकऱ्यांची सेंद्रिय हळदीला पसंती

Organic Farming: नांदेड जिल्ह्यातील मालेगाव व दापशेड येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय हळदीच्या शेतीत नव्या संधी शोधल्या आहेत. बाजारातील वाढती मागणी आणि उत्पादन खर्चात बचतीमुळे शेतकरी सेंद्रिय हळद उत्पादनाकडे वळत आहेत.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News: नांदेड जिल्ह्यात अलीकडच्या काळात सेंद्रिय पद्धतीने हळद पिकविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शासनाचे सेंद्रिय शेतीला दिले जाणारे प्रोत्साहन तसेच बाजारातील सेंद्रिय हळदीची मागणी लक्षात घेता शेतकरी काही निविष्ठा शेतातच तयार करून हळदीचे उत्पादन घेण्यात तरबेज झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत हळदीचे पीक घेतले जाते. यात सर्वाधिक अर्धापूर, नांदेड, मुदखेड, भोकर, हदगाव, नायगाव, कंधार, लोहा या तालुक्यांत घेतले जाते. इतर पिकांपेक्षा हळद पिकाला मेहनत जास्त तसेच उत्पादन खर्चही अधिक असल्यामुळे शेतकरी उपलब्ध असलेल्या जमिनीपैकी एक ते दोन एकरांत हळद पीक हमखास घेतात.

सध्या हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी लक्षात घेता अलीकडच्या काळात सेलम, फुले स्वरूपा, मेघालयातील हळदवाण आदींची सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्याचा कल वाढला आहे. यासाठी लागणाऱ्या निविष्ठा स्वत: तयार करुन त्याचा वापर करण्यात येतो. यामुळे रासायनिक निविष्ठांवरील खर्चात बचत होते.

नांदेड जिल्ह्यातील मालेगाव (ता. अर्धापूर) येथील भगवान इंगोले व संदीप डाकुलगे हे मागील अनेक वर्षांपासून रासायनिक मुक्त हळदीसह इतर पिकांची शेती करतात. सध्या हळदीचे पीकही सेंद्रिय पद्धतीने घेत आहेत. भगवान इंगोले यांनी हळद इतर पिकांना लागणाऱ्या सेंद्रिय निविष्ठांमध्ये जिवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी पेंड, कडूनिंबावर आधारित कीटकनाशक, वेस्ट डी कंपोजर आदींचा वापर करतात.

दापशेड (ता. लोहा) येथील विश्‍वनाथ होळगे घन व द्रवरूप जिवामृताचा वापर करतात. सेंद्रिय हळदीला देशांतर्गत तसेच देशाबाहेर मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नांदेड जिल्ह्यात या सेंद्रिय हळदीपासून पावडर बनविले जाते. या हळद पावडरला बाजारभावापेक्षा वीस टक्के अधिकची रक्कम अधिक मिळते, असे त्यांनी सांगितले.

मागील सात वर्षांपासून अवशेषषमुक्त शेती करतो. त्यामुळे हळदीला इतर हळदीपेक्षा अधिकचे दर मिळते.
विश्‍वनाथ होळगे, शेतकरी, दापशेड, ता. लोहा. जि. नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT