Mosambi Agrowon
ॲग्रो विशेष

Nagpur APMC : कळमना बाजारात मोसंबीला १८ ते २२ रुपये किलो दर

Mosambi Rate : सध्या नागपूर जिल्ह्यातील कळमना बाजार समितीत मोसंबीची आवक वाढती असून १८ ते २२ रुपये असा घाऊक दर मोसंबीला मिळत आहे.

Team Agrowon

Nagpur News : संत्रा हंगामाला सप्टेंबर अखेरनंतर सुरुवात होणार आहे. मात्र सध्या कळमना बाजार समितीत मोसंबीची आवक वाढती असून १८ ते २२ रुपये असा घाऊक दर मोसंबीला मिळत असल्याची माहिती दि नागपूर फ्रूट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी दिली.

विदर्भात अमरावती आणि नागपूरनंतर आता वाशीम जिल्ह्यातदेखील संत्रा, मोसंबीखालील क्षेत्र वाढते आहे. अमरावती व नागपूर जिल्ह्यात संत्रा-मोसंबीची लागवड एक लाख हेक्‍टरच्या घरात आहे. त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे संत्र्याखालील आहे. आनंद डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसंबीचा हंगाम सुरू झाला असून सध्या बाजारात होणारी आवक ३० ते ३५ छोटे मालवाहू आणि १० ते १२ मोठ्या गाड्या (पाच ते आठ टन) अशी आहे.

मोसंबीचा दर १८ ते २२ रुपये किलो असा असून मालाची प्रत पाहून दर निश्‍चित होतो. विदर्भातील १५० किलोमीटर अंतरावरील भागातून छोट्या गाड्यातील मोसंबीची तर मोठ्या गाड्यातील आवक ही औरंगाबाद, जालना या भागांतून होत आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, सिलीगुडी, काठमांडू या भागात मोसंबीचा पुरवठा होतो. देशाच्या इतरही भागांतून मोसंबीला मागणी असल्याचे सांगण्यात आले.

संत्र्याची आवक सप्टेंबरअखेर

नागपूरला ऑरेंज सिटी असे म्हटले जाते. त्यामुळेच या भागातील वातावरणात उत्पादित संत्रा फळांना मागणी राहते. मात्र सध्या संत्र्याचा हंगाम नसल्याने बाजारात आवक नाही. आंबीया बहरातील संत्र्यांची आवक सप्टेंबरअखेर होते. या हंगामातील फळे जानेवारी मध्यापर्यंत उपलब्ध होतात. त्यानंतर २६ जानेवारीपासून मृग बहरातील संत्र्यांची उपलब्धता होते. गेल्या काही वर्षांपासून असलेले संत्रा फळगळीचे संकट यंदाही कायम आहे. परिणामी यंदा आवक कमी राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तूर दरात वाढ, आले आवकेत घट, बटाटा दरात घसरण, भेंडी दरात नरमाई तर मेथीचे भाव टिकून

Sericulture Award 2026: ‘उत्कृष्ट रेशीम उद्योग घटक’ पुरस्कारासाठी गिते दाम्पत्याची निवड!

Bhajani Mandal Grant: भजनी मंडळांना २५ हजार अनुदान; सदस्य, कार्यक्रम संख्येच्या निकषांत बदल, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Rainfall Deficit: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० मंडलांत पावसाचा खंड

Crop Stress: पावसाची मोठी उघडीप? पिकाचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT