Agricultural Market: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर येथील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्डात गुळाच्या हंगामातील पहिल्या सौद्यांना प्रारंभ झाला. .मंगळवारी (ता. १०) अडत व्यापारी बाबूराव अतितकर यांच्या दुकानात बाजार समितीचे सभापती प्रा. शेखर देसाई यांच्या हस्ते सौदे काढण्यात आले..Jaggery Industry Development: गूळ उद्योगासाठी अधिवेशनात कायदा.पाडव्याच्या मुहूर्तावरील सौद्यामध्ये तळाशी येथील लालासो पांडुरंग बिरांडे यांच्या ५१ गूळ रव्यांना सर्वाधिक प्रति क्विंटल ७०११ रुपये दर मिळाला. गूळ व्यापारी शिवगोंडा दादा सदलगे यांनी हा गूळ खरेदी केला..Jaggery Price: कोल्हापुरात गूळ दरात उसळी.उपसभापती पांडुरंग काशिद, अॅड. प्रकाश देसाई, भारत पाटील (भुयेकर), शंकर पाटील, संभाजी पाटील (पैलवान), सुयोग वाडकर, कुमार आहुजा, आकाराम केसरें (पैलवान), समितीचे सचिव तानाजी बाळू ढळवी,.उपसचिव वसंत पाटील, जीवन जाधव, शाहूपुरी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो पाटील (वडणगेकर), उपाध्यक्ष प्रवीण लिंगाडे यांच्यासह समितीचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल आणि तोलाईदार मोठ्या संख्येने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.