Na. Dho. Mahanor Agrowon
ॲग्रो विशेष

Indrajit Bhalerao : भक्ती ही शेवटी विरोधीभक्तीच राहिली !

Article by Indrajit Bhalerao : ‘मरणान्तानि वैरानी’ असं आपण म्हणतो. तसं आता महानोर आणि माझ्यामध्ये जे काय असेल नसेल ते वैर संपलेलं आहे.

Team Agrowon

इंद्रजित भालेराव

Na. Dho. Mahanor : ‘मरणान्तानि वैरानी’ असं आपण म्हणतो. तसं आता महानोर आणि माझ्यामध्ये जे काय असेल नसेल ते वैर संपलेलं आहे. खरंतर यादव असतानाही पुष्कळ दिवस आधीपासून त्यांचा माझा लळा कमी झालेला होता. पण महानोरांचा लळा कधी पूर्णपणे लागलेलाच नव्हता. माझी अशी कुचंबना मागची चाळीस वर्षे सतत सुरू होती.

मला वाटतं माझ्यासारखी अवस्था अनेकांची झाली असणार. काही जण लवकर सावरले. काही जणांना वेळ लागला. ग्रामीण साहित्य चळवळीवरून झालेल्या वादात नागनाथ कोतापल्लेही सहभागी होते. पण ते लवकरच ग्रामीण सहित्य चळवळीपासून दूर झाले. मार्क्सवादी चळवळीच्या जवळ गेले.

अगदी अलीकडं महानोरांच्या निधनापूर्वी वासुदेव मुलाटे मला त्यांचा दूरध्वनी क्रमांक मागत होते. त्यांनी नुकतंच ग्रामीण साहित्य चळवळीवर पुस्तक लिहिलेलं होतं. त्यात ग्रामीण साहित्य चळवळीचा सगळा इतिहास लिहिलेला आहे. महानोरांशी झालेल्या वादाचे संदर्भही त्यात आहेत. महानोर यांना प्रत्यक्ष बोलून त्यांना आपली वेदना व्यक्त करायची असावी.

कोतापल्ले आणि मुलाटे यांच्या तुलनेत वयानं मी खूप लहान. महानोरांच्या आणि माझ्या वयातही वीस वर्षांचं अंतर. पण तरीही माझी झालेली कुचंबणा मलाच कळत नव्हती. एका बाजूला अधूनमधून मी त्यांचा विरोधही करत होतो. माझा विरोध संपला, तर मराठी वाङ्‍मयव्यवहार आम्हा दोघांना एकमेकांच्या विरोधात उभं करत होता.

त्याची काही उदाहरणं मी वर दिलेली आहेतच. त्यामुळं महानोरांवरची माझी भक्ती ही शेवटी विरोधाभक्तीच राहिली. मी आतून महानोरांवर कायमच प्रेम केलं पण गरज पडेल तेव्हा वरून मात्र विरोधातही भूमिका घेतली.

ना. धों. महानोर आणि आनंद यादव यांना एकत्रित येऊ न देण्याविषयी काही शक्ती कार्यरत होत्या. त्या दोघांचे एकमेकांविरोधी विषयातले रस आणि थोडेफार वैयक्तिक स्वार्थही त्याला कारणीभूत होते, हे खरं आहे. हे दोघं एकत्रित आले असते, तर काय झालं असतं, याची केवळ रम्य कल्पनाच आम्ही करू शकतो.

पण ते कधीच मनानं एकत्रित आले नाहीत. नंतर नंतर एकूण मराठी वाङ्‍मयातच यादवांच्या बाजूंचे आणि महानोरांच्या बाजूचे असे दोन तट पडले. या दोघांनीही आपापल्या बाजूनं अवाङ्‍मयीन शक्ती उभ्या केल्या. ना. धों. महानोर राजकारणाच्या वळचणीला गेले, तर आनंद यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वळचणीला गेले.

यात अंतिमतः दोघांचंही नुकसान झालेलं आहे. त्यांच्यासोबत अनेकांचं नुकसान झालेलं आहे. एकूण मराठी वाङ्‍मयाचं देखील नुकसानच झालेलं आहे. अर्थात काही जणांचे वैयक्तिक फायदेही झाले असण्याची शक्यता आहेच.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT