Latur MIDC  Agrowon
ॲग्रो विशेष

Latur MIDC : मुंबईत लातूरच्या विकासावर चर्चा ; एमआयडीसी आणि विमानतळ प्रकल्प गतीमान होणार?

Latur Airport : एमआयडीसीमध्ये बाजार समितीचे मार्केट यार्ड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आकारण्यात आलेला दंड रद्द करून या उभारणीला मुदतवाढ देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

Team Agrowon

Latur News : येथील एमआयडीसीत जमिनीचे अधिग्रहण करणे, विमानतळाचे विस्तारीकरण आदी प्रश्नांसंदर्भात मुंबईत बुधवारी (ता. १९) बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार अमित देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे तसेच एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. येथील जुनी एमआयडीसी महानगरपालिका हद्दीत आहे.

महानगरपालिकेने आता येथील सर्व उद्योजकांना मालमत्ताकरांबाबत नोटिसा दिल्या आहेत. हा मालमत्ता कर छत्रपती संभाजीनगरपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे तो रद्द करावा किंवा कमी करावा. औद्योगिक परिसरातील मालमत्ता रक्ताच्या नात्यात हस्तांतरीत करताना त्या महसूल विभागाप्रमाणे ५०० रुपयांच्या शपथपत्राद्वारे करता याव्यात,

नवीन एमआयडीसी येथे ग्रामपंचायतीचा मालमत्ता करवसुलीचा झालेला निर्णय रद्द करावा आदी मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी दिली.

एमआयडीसीमध्ये बाजार समितीचे मार्केट यार्ड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आकारण्यात आलेला दंड रद्द करून या उभारणीला मुदतवाढ देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्पयासाठी चाटा भोयरा येथे जमिनीचे अधिगृहण करण्याचा निर्णय झाला होता मात्र त्यास नंतर स्थगिती देण्यात आली होती,

या बाबत पुर्नविचार करुन ही जमीन अधिग्रहण करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी निश्चित करण्यात आले. लातूरसाठी ऑटोमोबॉइल क्लस्टर मंजूर करावे त्यासाठी आष्टामोड परिसरात जमीन अधिग्रहण करावी, अशी मागणी देशमुख यांनी केल्यानंतर त्यास अनुकूलता दर्शवत त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना सामंत यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिल्या.

लातूर विमानतळ विस्तारीकरणाचे काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे, ८.८९ हेक्टर जमिनीचे प्रलंबीत असलेले अधिग्रहण त्वरीत पूर्ण करावे, संरक्षण भिंतीचे बांधकाम त्वरीत पूर्ण करावे. विमानतळाची देखभाल एअरपोर्ट ॲथारिटी ऑफ इंडियाकडे द्यावी, अशी मागणीही देशमुख यांनी यावेळी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT