Chincholi MIDC : कासेगाव, मोडनिंब एमआयडीसीसाठी भूसंपादन ; चिंचोली एमआयडीसी घेणार १४१ हेक्टर जमीन

Kasegaon, Modnimb MIDC Land acquisition : जिल्ह्यात कासेगाव, मोडनिंब येथे नवीन एमआयडीसी होत आहेत. त्यासाठी सध्या प्रकरण सहा मंजूर झाले असून त्याअंतर्गत भूसंपादनाची कार्यवाही सुरु झाली आहे.
Land Acquisition
Land Acquisition Agrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर : जिल्ह्यात कासेगाव, मोडनिंब येथे नवीन एमआयडीसी होत आहेत. त्यासाठी सध्या प्रकरण सहा मंजूर झाले असून त्याअंतर्गत भूसंपादनाची कार्यवाही सुरु झाली आहे. दुसरीकडे चिंचोलीअंतर्गत अतिरिक्त चिंचोलीसाठी आणखी १५१ हेक्टर जमिनीच्या संपादनाचा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे.

कुंभारी एमआयडीसीचाही प्रश्न यावर्षी मार्गी लागेल अशी आशा आहे. या नव्या एमआयडीसींच्या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास ३० हजार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होतील अशी आशा आहे.

सोलापूरची विमानसेवा सुरू झाली असून आगामी काळात मार्ग निश्चित होऊन विमानसेवा सुरळीत होईल. दुसरीकडे महामार्गांची कनेक्टिव्हीटीही उत्तम आहे.

Land Acquisition
Karjat MIDC : कर्जत एमआयडीसी होण्याचा मार्ग मोकळा; अंतरिम मंजुरी

उद्योगांसाठी उजनी धरणाचे पाणी देखील उपलब्ध होईल. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजक इच्छुक असल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर कायमचे थांबविण्यासाठी या एमआयडीसींचा प्रश्न निकाली निघणे आवश्यक आहे. कासेगाव (पंढरपूर) एमआयडीसीसाठी पहिल्या टप्प्यात २२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

तर मोडनिंब एमआयडीसीसाठी १०० हेक्टरहून अधिक जमिनीचे संपादन होईल. कुंभारीसाठीही मोठी जमीन लागणार आहे. या नव्या एमआयडीसींसाठी भूसंपादन वेळेत होऊन त्याठिकाणी मोठे उद्योग आल्यास जिल्ह्यातील बेरोजगारी निश्चित कमी होईल, असा सर्वांनाच विश्वास आहे. त्यासाठी नवनिर्वाचित आमदारांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरणार आहे.

जिल्ह्यात कासेगाव, मोडनिंब व कुंभारी येथे नव्याने एमआयडीसी प्रस्तावित आहेत. चिंचोली एमआयडीसीअंतर्गत अतिरिक्त चिंचोलीचाही प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यासाठी वाढीव १५१ हेक्टर जमीन संपादित होईल. नव्या एमआयडीसीतून अनेकांना रोजगार उपलब्ध होईल हे निश्चित आहे.

- शिवाजी राठोड, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, सोलापूर

जलंसपदा’च्या २४ कोटींचा प्रश्‍न

कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्रस्तावित एमआयडीसीचा प्रश्न काही वर्षांपासून प्रलंबितच आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी प्रयत्न केले पण अजूनही त्यांना पूर्णत: यश मिळालेले नाही. या एमआयडीसीसाठी अधिग्रहित होणाऱ्या क्षेत्रात जलसंपदा विभागाची काही जागा आहे. त्यासाठी एमआयडीसीला २४ कोटी रुपये जलसंपदा विभागाला द्यावे लागणार आहेत. पण, शासनाचाच तो विभाग असल्याने ही रक्कम माफ व्हावी, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे अनेक महिन्यांपासून पडून आहे. तो मार्गी लागल्यावर खासगी जमिनीच्या संपादनाला सुरवात होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com