Beed Apmc Election
Beed Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Market Committee Election : गेवराई बाजार समितीच्या सभापतिपदी मुजीब पठाण

Team Agrowon

Apmc Beed News : गेवराई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले. सोमवारी (ता.१५) बाजार समितीच्या सभापतिपदी मुजीब पठाण तर उपसभापतिपदी विकास सानप यांची बिनविरोध निवड झाली.

गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पंडित यांना भाजप आमदार लक्ष्मण पवार आणि माजी आमदार बदामराव पंडित यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली १८ पैकी १८ संचालक ९० टक्क्यांहून अधिकची मते घेऊन विजय झाले. या निवडणुकीत आजी-माजी आमदारांच्या पॅनेलचा राष्ट्रवादीकडून धुव्वा उडाला.

दरम्यान, सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत पठाण यांचा सभापतिपदासाठी तर विकास सानप यांचा उपसभापतिपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला.

त्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. अमरसिंह पंडित यांनी निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी सभापती आणि उपसभापती पदाच्या उमेदवारांची घोषणा केली. बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोषात या निवडीचे स्वागत केले.

‘‘गेवराई बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम समाजाचा व्यक्ती सभापतिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाला आहे. सर्वांनी मिळून एकत्रित कारभार करून बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांची सेवा करायची आहे,’’ असे प्रतिपादन अमरसिंह पंडित यांनी केले.

नवनिर्वाचित संचालक अशोक नाईकवाडे, रामलाल धस, महारुद्र चाळक, हनुमान कोकणे, पांडुरंग मुळे, बाबासाहेब जाधव, वैशाली बाबू जाधव, लक्ष्मीबाई नारायण पवार, रमेश साखरे, अशोक खरात, रमेश खोपडे, मंगेश कांबळे, जगन्नाथ काळे, रामभाऊ चाळक, दिलीपकुमार गंगवाल आणि कृष्णा राऊत यांचाही सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT