KRIBHCO Managing Director, M.R. Sharma Agrowon
ॲग्रो विशेष

M.R. Sharma : कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी एम. आर. शर्मा यांची नियुक्ती

Roshan Talape

Pune News : कृषक भारती कॉ-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या (KRIBHCO) व्यवस्थापकीय संचालकपदी एम. आर. शर्मा यांनी या अतिरिक्त पदाचा पदभार १ सप्टेंबरला स्विकारला असून व्यतिरिक्त संचालक (तांत्रिक) म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या सहकारी संस्थेतील कृषक भारती कोऑपरेटिव्ह ही संस्था रासायनिक खते, (Chemical Fertilizers) सहकारी संस्था आणि संस्थात्मक एजन्सीजच्या माध्यमातून तयार करुन वितरित करण्याचे काम करते. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आणि शेतकरी कल्याणासाठी विविध उपक्रम राबवते.

शर्मा यांचा अनुभव

शर्मा हे 1982 च्या बॅचचे ते पदवीधर अभियंता आहेत. त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात ते पहिले प्रशिक्षणार्थी ते व्यवस्थापकीय संचालक, (तांत्रिक) पदावर पोहोचणारे पहिले पदवीधर अभियंता आहेत. त्यांनी अमोनिया आणि युरिया कॉम्प्लेक्सच्या सुधारणेसाठी व उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले. कृषक विभागात शर्मा यांना ४२ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

कोरोना विषाणूच्या काळात कच्चा माल आणि कामगार उपलब्ध होत नव्हते त्यावेळी पश्‍चिम भारतातील बहुतेक खत संयंत्रे बंद झाली होती. तेव्हा शर्मा यांनी आधुनिक उत्पादन प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणपूरक उत्पादन पद्धतींवर भर दिला होता.

शर्मा यांच्या कामगिरीबद्दल त्यांना उत्कृष्ट सीईओ म्हणून सदर्न गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तर्फे सन्मानित करण्यात आले. त्यासोबत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या प्रतिष्ठित 'द सीईओ मॅगझिन' मध्ये त्यांची निवड करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Stock Limit : तूर, हरभऱ्यावरचे स्टाॅक लिमिट काढले; नवी तूर बाजारात येण्याच्या आधी स्टाॅक लिमिट काढल्याने दिलासा

Amravati Zila Parishad : अमरावती जिल्हा परिषदेत विधानसभा च्या तोंडावर, अधिकाऱ्यांची कमतरता

Crop Insurance Compensation : विमा कंपनीच्या पोर्टल बंदमुळे पूर्वसूचना थांबल्या

Onion Subsidy : राज्यातील १३ हजार कांदा उत्पादकांचे रखडलेले २४ कोटी आचारसंहितेपूर्वी द्या, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

Rabbi Season : रब्बीमध्ये हरभऱ्याला सर्वाधिक पसंती शक्य

SCROLL FOR NEXT