Union Agriculture Secretary : केंद्रीय कृषी सचिवपदी देवेश चतुर्वेदी यांची नियुक्ती

Devesh Chaturvedi : भारत सरकारने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात कृषी सचिव म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी देवेश चतुर्वेदी यांची नियुक्ती केली आहे.
Devesh Chaturvedi
Devesh Chaturvedi Agrowon
Published on
Updated on

New Delhi News : भारत सरकारने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात कृषी सचिव म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी देवेश चतुर्वेदी यांची नियुक्ती केली आहे. चतुर्वेदी हे उत्तर प्रदेश कॅडरचे सनदी अधिकारी आहेत.

भारतीय प्रशासकीय सेवेत ते १९८९ च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये कृषी उत्पादन आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. याआधी, त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

Devesh Chaturvedi
Kharif Crop Insurance : खरीप पीकविमा योजनेत १२ लाख ४६ हजारांवर अर्ज

देवेश चतुर्वेदी यांनी लखनऊ, बुलंदशहर, कानपूर, गोरखपूर आणि मुरादाबाद या जिल्ह्यांमध्ये जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम केले आहे.

Devesh Chaturvedi
MSP Guarantee: राज्यात हमीभाव खरेदीची मागणी का जोर धरू लागली?

त्यांनी कृषी शिक्षण आणि संशोधन विभाग आणि कृषी विपणन विभाग, कृषी विदेश व्यापार आणि निर्यात प्रोत्साहन ही पदेही भूषविली आहेत. त्यांची कृषी विभागातील सखोल माहिती आणि अनुभव लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.

चतुर्वेदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये कृषी विकास व कृषी व्यापार वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नियुक्तीने कृषी क्षेत्रात नवी दिशा आणि सुधारणा होण्याची आशा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com