Kidney Donation  Agrowon
ॲग्रो विशेष

Kidney Donation : सुनेसाठी सासूने लावले आयुष्यच पणाला

Mother In Law Happily Donated Her Kidney To Daughter In Law : ‘‘आमचे २१ जणांचे एकत्र कुटुंब. मुलगा पांडूला दोन लहान मुलं. सुनेच्या दोन्ही किडन्या खराब. सून घरात रडायची. नातवंडे पण रडायची. हे बघवेना. नातवंडांच्या तोंडाकडे पाहून सुनेला हसत हसत किडनी दिली.

Team Agrowon

Pune News : ‘‘आमचे २१ जणांचे एकत्र कुटुंब. मुलगा पांडूला दोन लहान मुलं. सुनेच्या दोन्ही किडन्या खराब. सून घरात रडायची. नातवंडे पण रडायची. हे बघवेना. नातवंडांच्या तोंडाकडे पाहून सुनेला हसत हसत किडनी दिली.

आता आम्ही दोघी ठणठणीत आहोत. आज नातवडं, सून, मुलगा सगळे खूष आहोत. नशिबाने कोरोनातून जगलो वाचलो. भरल्या घरात आणखी काय पाहिजे, माझे काय आज आहे तर उद्या नाही,’’ हे बोल आहेत आदर्श सासू द्रोपदा खंडू जाधव यांचे.

सासू-सुनांचा वितुष्टपणा अनेकदा आपण ऐकतो व पाहतो. पण, गिरीम (ता. दौंड) येथील वरील घटना पाहता ती विलक्षण वाटते व एेकणारा चाट होतो. सून वैशाली पांडुरंग जाधव (वय ३८) यांना वर्षापूर्वी हातापायांना सूज येऊन दम लागत होता. रक्त कमी झाले होते. तपासण्या केल्या तर किडन्यांची समस्या समोर आली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दौंड येथील कार्यकर्ते नंदू पवार यांनी वैशाली जाधव व किडनीतज्ज्ञ डॉ. सूर्यभान भालेराव यांची भेट घालून दिली. तपासणीनंतर डॅाक्टरांनी किडन्या बदलण्याचा सल्ला दिला. त्यामुळे जाधव कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली.

आठवड्यातून दोनदा डायलिसीस करावे लागत होते. किडणीसाठी शोधाशोध सुरू झाली. आई, वडील, चुलते हे किडनी द्यायला पुढे आले; परंतु, त्यांचा फिटनेस ठिक नव्हता. घरात पुन्हा रडारड सुरू झाली. भरल्या घरात कुणाला अन्न गोड लागेना. दरम्यान, पांडुरंग हे किडनी द्यायला तयार झाला. परंतु, आई द्रौपदा हिने त्यास नकार देत स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेतला.

सून वैशाली हिचे नशीब बलवत्तर की ६८ वयातही द्रौपदाबाईंचा फिटनेस उत्तम आला. वैद्यकीय तपासणीत सर्व आवश्यक बाबी जुळल्या. आमदार राहुल कुल, नंदू पवार, सरपंच मनोज जाधव यांची मदत झाली. मार्च २०२३ मध्ये डॉ. भालेराव यांनी यशस्वीरीत्या किडनी प्रत्यारोपण केले. सासूने सुनेला किडनी देणे हे आमच्या रुग्णालयातील पहिलेच उदाहरण असल्याचे डॅाक्टरांनी नमूद केले आहे.

‘माझ्यासाठी सासूबाई देवदूत’

सासूचे गुण गाताना वैशाली जाधव यांचे डोळे भरून आले. सुनेकडे पाहत द्रौपदाबाईंनी डोळ्याला पदर लावला. वैशाली म्हणाल्या, ‘‘सासू द्रौपदांबाईंनी मला पुनर्जन्म दिला. माझ्या लहान लेकरांना आई दिली. माझ्या नवऱ्याला बायको दिली. त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मी भाग्यवान आहे, मला अशी सासू मिळाली. त्या माझ्यासाठी देवदूत आहेत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: राज्यात ‘लम्पी स्कीन’ पुन्हा डोके वर काढतोय

Jan Suraksha Bill: ‘जनसुरक्षा’ दोन्ही सभागृहांत मंजूर

Animal Husbandry Status: पशुपालनाला आता कृषी समकक्ष दर्जा

Cotton Mission 2030: देश कापूस क्षेत्रात २०३० पर्यंत स्वयंपूर्ण करणार

Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT