Literacy Mission  Agrowon
ॲग्रो विशेष

Literacy Mission : सव्वाचार लाख निरक्षरांच्या नावे लागले आता साक्षरतेचे बिरुद

सुदर्शन सुतार

Solapur News : वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, प्रशासनिक अशा विविध कारणांमुळे साक्षरतेपासून वंचित राहिलेल्या आणि त्यामुळे आपल्या नावाला निरक्षरतेचा कलंक चिकटलेल्यांपैकी महाराष्ट्रातील सुमारे सव्वाचार लाख लोकांनी ६ मे रोजी हा कलंक पुसून टाकला. आता हे सर्वजण साक्षरतेचे बिरुद आपल्या नावाबरोबर अभिमानाने मिरवणार आहेत.

निमित्त होते केंद्राच्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमातील पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या महाराष्ट्रात प्रथमच घेण्यात आलेल्या चाचणीच्या निकालाचे. केंद्र शासनाने सोमवारी ६ मे रोजी हा निकाल घोषित केला. दहावी-बारावी सारख्या निकालाइतकी उत्सुकता नसली, तरी मोठ्या आतुरतेने प्रौढ परीक्षार्थी निकालासाठी उत्सुक होते.

महाराष्ट्रात ९२.६८ टक्के इतके नव साक्षर उत्तीर्ण झाले आहेत. तर ७.३२ टक्के नवसाक्षरांना ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा मिळाला आहे. एरवी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आजी-आजोबा, आई-वडील व नातेवाइक आपल्या पाल्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त करतात, या निकालानंतर नेमके या उलट चित्र होते.

राज्यात या अभियानात साक्षरतेच्या प्रचारक ठरलेल्या आणि केंद्र शासनाने दखल घेतलेल्या चिंचणी-सातारा येथील बबई मस्कर आणि पुणे जिल्ह्यातील बारामती येथील सुशीला क्षीरसागर या दोघीही उत्तीर्ण झाल्या आहेत. सन २०२२ ते २७ या पंचवार्षिक कालावधीत हे अभियान राज्यांच्या मदतीने केंद्र शासन राबवत आहे.

महाराष्ट्रात २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी ६३ लाख असाक्षर आहेत. मागील वर्षभरात १५ मार्च अखेर राज्यात ६ लाख ४१ हजार ८१६ इतक्या असाक्षरांची केंद्र शासनाच्या उल्लास ॲपवर ऑनलाइन नोंदणी झाली होती. त्यातील ४ लाख ५९ हजार ५३३ जणांनी १७ मार्च रोजी राज्यात ३६ हजार परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मुक्त विद्यालये शिक्षण संस्थेने (एनआयओएस) हा निकाल www.nios.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन घोषित केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT