Heavy Rain Condition  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : चार लाख हेक्टरहून अधिकपिकांना पावसाचा फटका

Unseasonal Rain Crop Damage : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील २२ जिल्ह्यांत ३ लाख ९३ हजार ३३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री कार्यालयाने व्यक्त केला आहे.

Team Agrowon

Mumbai News : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील २२ जिल्ह्यांत ३ लाख ९३ हजार ३३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री कार्यालयाने व्यक्त केला आहे.

अद्यापही नुकसानग्रस्त दहाहून अधिक जिल्ह्यांची आकडेवारी येणे बाकी असून, साडेचार लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असून, राज्य सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हिवाळी अधिवेशन तोंडावर असल्याने तत्पूर्वी शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यासाठी प्रशासनाला कामाला लावले आहे. येत्या दोन दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण होण्याची चिन्हे असून, तत्काळ मदतही वितरित करण्याचे आदेश होण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने सहा जणांना मृत्यू झाला होता. तर १६१ जनावरे दगावली होती. तसेच कांदा आणि द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे उसाची तोड थांबल्याने कारखान्यांच्या गळीत हंगामावरही परिणाम झाला आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी, मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू असून, गुरुवार (ता. ३०) अखेर २२ जिल्ह्यांतील नुकसानीची आकडेवारी समोर आली असून,

या पावसाने यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान केले असून येथे १ लाख २६ हजार ४३८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. हरभरा, कापूस, तूर, गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात येथे नुकसान केले आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात ७९ हजार ४०२ हेक्टरवरील भाजीपाला, तूर, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, निफाड, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला येथील, ३३ हजार ३३८ हेक्टरवरील कांदा, द्राक्षे, सोयाबीन, मका, गहू, ऊस आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री तालुक्यांतील ४५ हजार ७८३ हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, मका पिकांचे नुकसान झाले आहे.

संयुक्त पंचनामे
कृषी आणि महसूल विभागाला पंचनाम्याचे आदेश दिले असून, पंचनामे झाल्यानंतर ही आकडेवारी संगणक प्रणालीवर अपलोड करण्यात येते. त्यामुळे अद्यापही काही नुकसानग्रस्त जिल्ह्यांतील पिकांच्या नुकसानीची आकडेवारी समोर आलेली नाही. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असूनही अद्याप तेथील नुकसानीची आकडेवारी समोर आलेली नाही.

जिल्हानिहाय नुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये)
रत्नागिरी : ५३
सिंधुदुर्ग : १
नाशिक : ३३३८८
धुळे : २३४
नंदुरबार : २७८३
जळगाव : ९०५
अहमदनगर : १५३२०७
पुणे : ३५००
सातारा : १५
छत्रपती संभाजीनगर : ४५७८३
जालना : १३०४९
बीड : २१५
हिंगोली : ७९०२
परभणी : १०००
नांदेड : ५०
बुलडाणा : ६३२५०
अकोला : ६८९२१
वाशीम : ४६२
यवतमाळ : १२६४३८
गडचिरोली : ३०

पावसामुळे अडथळे
काही जिल्ह्यांमध्ये अजूनही अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे पंचनाम्यांमध्ये अडथळे येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच पावसामुळे नुकसानीचा आकडा अजून वाढू शकतो, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT