Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : सिंधुदुर्गात पावसाचे जोरदार पुनरागमन

Rain Update : तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १३) पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. मुसळधार पावसामुळे अनेक भागात दाणादाण उडाली. देवगडात वाहतूक विस्कळीत झाली.

एकनाथ पवार

Sindhudurg News : तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १३) पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. मुसळधार पावसामुळे अनेक भागात दाणादाण उडाली. देवगडात वाहतूक विस्कळीत झाली. काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. नदीनाल्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. दरम्यान कणकवलीतील एकाचा मृत्यू झाला आहे.

पंधरा दिवसानतंर विजाचा गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. देवगड तालुक्याला पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे जामसंडे येथे देवगड नांदगाव या मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. याशिवाय अन्य काही मार्गावरील वाहतूक पावसाच्या पाण्यामुळे विस्कळीत झाली.

देवगड तालुक्यातील काही गावांमध्ये आंबा बागांमधून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहत होते. जिल्ह्यात सायंकाळी पावसाचा जोर आणखीनच वाढला. कणकवली, वैभववाडी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला.

कणकवली शहरात देखील पावसाने दाणादाण उडाली. शहरातील सखल भागामध्ये पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागली. कणकवली तालुक्यातील कळसुली येथील महेश दिनकर देसाई (वय ५२) हे ओहोळच्या गुरुवारी पाण्यातून वाहुन गेले होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात हलक्या सरी सुरू असून पावसाचे वातावरण आहे. पावसामुळे शेतीकामांना वेग आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत रोपवाटिका तयार केल्या नव्हत्या त्यांनी सुरुवात केली आहे.

दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढण्याचे संकेत आहेत. हवामान विभागाने १३ आणि १४ जून रोजी आँरेज तर १५ जून रेड अलर्ट दिला आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

देवगड १६६.३, मालवण ७९.४, सावंतवाडी ३७, वेंगुर्ला ४५.८, कणकवली ६४.२, कुडाळ ४१.१, वैभववाडी ९२.६, दोडामार्ग २३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri College Land Issue: कृषी महाविद्यालयातील आठ एकर जमीन नापीक

Hingoli Turmeric Market: हिंगोली बाजार समितीत हळदीची ३ लाख १९ हजार क्विंटल आवक

Fuel and Fertilizer Prices: इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार

Cotton Procurement Policy: कापूस खरेदीऐवजी भावांतर राबविणार

Maharashtra Heat Update: राज्यात उष्णतेची लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT