Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon 2025 : मॉन्सून केरळ, कर्नाटक ओलांडून महाराष्ट्रात दाखल

Early Monsoon India: शनिवारी (ता. २४) मॉन्सून केरळ, तमिळनाडू व कर्नाटकात एकाच दिवशी दाखल झाला. विशेष म्हणजे केरळात पोहोचल्यानंतर दरवर्षी कर्नाटक किनारपट्टीवर रेंगाळणारा मॉन्सूनने या वर्षी एकाच वेळी संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी काबीज केली.

Team Agrowon

Monsoon Prediction:

मॉन्सूनची ही वेगवान मजल कशामुळे घडून आली?

दोन दिवसांपूर्वी, कर्नाटक किनारपट्टीवर तयार झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र ठळक आणि स्पष्ट स्वरूपात निर्माण झाले. त्यानंतर त्याची तीव्रता चढत्या क्रमाने वाढतच गेली. या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने अरबी समुद्र, पश्‍चिम किनारपट्टीच्या समांतर उत्तरेकडे आपले मार्गक्रमण सुरू केले. त्याच्या परिणामातून कर्नाटक व महाराष्ट्राला अवकाळी अशा गडगडाटी पावसाने झोडपून काढले. 

तोपर्यंत मॉन्सून अरबी समुद्रात जवळपास श्रीलंका काबीज करून पुढे सरसावलेला होता. मॉन्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेने एका दमात (केवळ चोवीस तासांत) अरबी समुद्र ओलांडून उत्तरेकडे एकूण ६ अंश अक्षवृत्त अंतर पार करत  देशाच्या भू- भागावरील साधारण ९ ते १५ अंश उत्तर अक्षवृत्त (अंदाजे ६००० कि.मी.) अंतर कापले आणि आता मॉन्सून गोवा राज्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

सहा हजार कि.मी.चा सागरी व भू-भागावरील हा पल्ला खेचण्यास केवळ या तीव्र कमी दाब क्षेत्रानेच मदत केली, असे म्हणावे लागले. एखाद्या प्रणालीची साथ मिळाली तर आपल्या प्रवाहाची (मोसमी वाऱ्यांची) ताकद काय असते, हे दिसून आले.

सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रात पेरणी करावी काय?

या वर्षी मे महिन्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे जमिनीत भरपूर ओल निर्माण झाली असून, पुढील मशागतीस सध्या वाफसा नाही. त्यातच महाराष्ट्रात २ ते ३ दिवसांत मॉन्सूनचा प्रवेश होण्याचा अंदाज आहे. वाफशासह मे महिन्यातच जर पेरणी केली तर ती पेरणी वेळेआधीची आणि अतिआगाप ठरू शकते. कारण उष्ण-संवहनी प्रक्रियेतून अवकाळी पावसाने मिळालेली जमीन ओल आणि प्रशांत महासागरातून मोसमी वाऱ्यांनी वाहून आणलेल्या आर्द्रतेतून झालेल्या मॉन्सूनच्या पावसानंतर पूर्वओलीस मिळालेल्या थंडाव्यातील ओलीची साथ यात नक्कीच फरक असतो. मॉन्सूनच्या पावसानंतर जमीन ओलीस अधिक थंडावा मिळाल्यानंतरच  जूनमध्ये शेतकऱ्यांनी चांगल्या वाफशावरच पेरणीचा विचार करावा, असे वाटते. अर्थात, या बाबत शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या विवेकानुसार निर्णय घ्यावा.

आगाप पेरणीची घाई का आणि त्याचे फायदे काय असतात?

खरीप हंगामातील पिके उदा. तूर, कपाशी, टोमॅटो, भुईमूग इ. व त्यांच्या वाणांची पक्वता ही अधिक उशिरा होते. शेतकऱ्यांकडील असलेल्या उपलब्ध पाण्याच्या नियोजनात त्या पिकांच्या सिंचनाची सोय होऊ शकेल की नाही, याचा ताण शेतकऱ्यांवर कायम असतो. म्हणून मॉन्सून पावसाचा पुरेपूर कालावधी पिकाला भोगता यावा, आणि सिंचनाचे काम कमीत कमी पाण्यामध्ये करता येईल, या उद्देशाने अनेक शेतकरी लवकर पेरणीची घाई करतात.

जमिनीत आवश्यक ओलावा राहून जमिनीच्या सुपीकतेला बाधा येत नाही.  पीक वाढीमुळे जमिनीवर पिकाची सावली धरली जाते. जमिनीतील ओलावा कितीही पावसामुळे वाढला तरी पीक पाणी शोषण करते. जमिनीत अतिओलाव्यामुळे बुरशी तयार होण्याचे प्रमाणही कमी राहते. किडीचा प्रादुर्भाव कमी राहून पीक संरक्षणाच्या खर्चात बचत होते. तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. झाला तरी बंदोबस्त करणे शक्य होते.

आगाप पिकाच्या खळ्यावर, राशीला आगाप पिकाची झड किंवा भर जास्त येते. शिवाय पीकही बाजारात लवकर येते. सुरुवातीच्या मागणीमुळे मालाला दर चांगला मिळतो. पीक काढणीच्या वेळी ही सप्टेंबर सुरुवातीला पूर्वा नक्षत्रात शेवटी झटपट पीक काढता येते. झटपट खळे तयार करता येते. काढणीस त्रास होत नाही. धूळ पेरणीसारखी, ओलीवरच्या आगाप पीक उताराची धास्ती व भीती कमी राहते. कारण पीक उताराही चांगला होतो. त्यानंतर रान मशागत करून जमिनीला हवा खेळती राहते. उत्तरा व हस्त नक्षत्राच्या पावसामुळे ओल संचित करून रब्बी पेरण्या किंवा लागवडी करता येतात. त्यामुळे त्या रब्बी हंगामाची पूर्ण थंडी पिकाला मिळू शकते. त्यामुळे रब्बीतील पिकेही चांगली साधून खळ्यावर  अधिक उत्पादन हाती येऊ शकते.

या वर्षी मे महिन्यात एवढा अवकाळी पाऊस कशामुळे?

या वर्षी साधारण २० मेपासूनच महाराष्ट्रात अवकाळी वातावरणाला सुरुवात झाली. मे महिन्यात मात्र अवकाळी पावसाच्या दिवसात खूप वाढ झाली. त्यामुळे रब्बी हंगामातील मागास पेर व लागवडीच्या पिकांचे काढणीच्या वेळेस खूप नुकसान झाले. मे महिन्यात अरबी व बंगालच्या उपसागरांत एकाच वेळी आवर्ती व प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांच्या प्रणालींचे अस्तित्व कायमच टिकून राहिले. या अस्थिर वातावरणातून महाराष्ट्रात या वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाची वारंवारिता वाढली.

आता महाराष्ट्रात मॉन्सून कधी येणार?

सध्या अस्तित्वात असलेले तीव्र कमी दाब क्षेत्राचे, अरबी समुद्र पश्‍चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे म्हणजे महाराष्ट्राकडे होणारे मार्गक्रमण सुरूच आहे. शनिवारी दुपारी बारा वाजता रत्नागिरीजवळ महाराष्ट्राची किनारपट्टी व सह्याद्री ओलांडून संध्याकाळी साडेपाच वाजता सांगलीच्या वायव्येकडे ४० कि.मी. अंतरापर्यंत पोहोचले होते.

शिवाय येत्या मंगळवारी (ता. २७) पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात  पण काहीसे उत्तरेकडे कमी दाबाच्या क्षेत्र निर्मितीची शक्यता दिसत आहे. त्यामुळे मॉन्सून प्रवाहाला अधिक बळकटी व ऊर्जितावस्था मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्याची मॉन्सूनची आगेकूच याच वेगाने सुरू राहिल्यास सामान्यतः ५ ते ६ जूनच्या दरम्यान दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश करणारा मॉन्सून या वर्षी कदाचित मंगळवारी (ता. २७) महाराष्ट्रात प्रवेश करू शकेल असे वाटत होते. पण त्यापेक्षाही वेगाने तो कोकणात उतरला.

- माणिकराव खुळे ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५ (सेवानिवृत्त हवामान शास्त्रज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT