Paddy Varieties  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Advisory : कृषी सल्ला ः कोकण विभाग

Paddy Farming : भात पेरणी होऊन १५ दिवसांचा कालावधी झालेल्या ठिकाणी युरिया १ किलो प्रति गुंठा क्षेत्र प्रमाणे खताचा दुसरा हप्ता द्यावा.

Team Agrowon

Crop Advisory For Konkan Region :

खरीप भात

रोपवाटिका व्यवस्थापन

भात पेरणी होऊन १५ दिवसांचा कालावधी झालेल्या ठिकाणी युरिया १ किलो प्रति गुंठा क्षेत्र प्रमाणे खताचा दुसरा हप्ता द्यावा.

मुसळधार पावसामुळे भात रोपवाटिकेतील रोपे पिवळी पडत असल्यास युरिया (१ टक्के) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.

भाताची रोपे लागवडी योग्य झाली असतील अशा ठिकाणी पुनर्लागवडीची कामे सुरू करावीत. पावसाची तीव्रता कमी असताना पुनर्लागवडीची कामे करावीत.

पुनर्लागवडीसाठी १२ ते १५ सेमी उंचीची आणि ५ ते ६ पाने फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार २१ ते २७ दिवसांची रोपे वापरावीत.

जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी १५ बाय १५ किंवा २० बाय १५ सेमी अंतरावर करावी. लावणी सरळ आणि उथळ २.५ ते ३.५ सेंमी खोल करावी. उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात. एका चुडामध्ये २ ते ३ रोपे लावावीत, संकरित भातासाठी एका ठिकाणी एकच रोप लावावे.

भात पिकास चिखलणीच्या वेळी नत्र ४० किलो, स्फुरद ५० किलो आणि पालाश ५० किलो (म्हणजेच ८७ किलो युरिया, ३१३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८४ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी द्यावे.

चिखलणीच्या वेळेस हेक्टरी ५ टन गिरीपुष्पाचा पाला दिल्यास नत्र खताची ५० टक्के मात्रा कमी करून द्यावी.

भात रोपवाटिकेत अतिरिक्त साचलेल्या पाण्याने रोपांचे नुकसान होऊ शकते. त्यासाठी रोपवाटिकेच्या चारही बाजूंनी चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

नागली, वरी

रोपवाटिका व्यवस्थापन

नागली पिकाच्या रोपवाटिकेस १५ दिवस झाले असल्यास, रोपवाटिकेतील तणांची बेणणी करून युरिया खताची दुसरी मात्रा १ किलो युरिया प्रति गुंठा प्रमाणात द्यावी.

मुसळधार पावसामुळे रोपवाटिकेतील रोपे पिवळी पडत असल्यास युरिया (१ टक्का) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.

जोराच्या पावसामुळे रोपवाटिकेत साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

रोपवाटिकेतील वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी भाजीपाला रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी बेणणी करावी. त्यानंतर ५० ग्रॅम युरिया खताची मात्रा प्रति वाफा प्रमाणे पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी.

रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.

वेलवर्गीय भाजीपाला

पडवळ, कारली, दुधी भोपळा, शिराळी पिके वेल टाकू लागल्यावर त्यांना आधार देण्यासाठी मंडपाची व्यवस्था करावी.

लागवड केलेल्या वेलवर्गीय भाजीपाला पिकातून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.

८१४९४६७४०१, (०२३५८) २८२३८७

(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Insurance Compensation: सोयाबीन विम्याचे ११४६ कोटी मंजूर

Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ

Maha Annapurna Project: भात शेतीच्या कायापालटासाठी ‘महाअन्नपूर्णा प्रकल्प’

Drip Vendor Registration Issues: ठिबक विक्रेता नोंदणी रखडली

Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT