Modi cabinet decision  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Subsidy : शेतकऱ्यांना दिलासा ! खतावर मिळत राहणार सबसिडी ; युरियाच्या किमती स्थिर

Modi Cabinet Decision : केंद्र सरकारकडून खतांवर अनुदान सुरूच ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे खतांच्या किमतीवर कोणताही परिणाम होऊ देणार नाही.

Swapnil Shinde

Farmers Subsidy On Fertilizer : केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगामासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांसाठी २२,३०३ कोटी रुपयांच्या अनुदानास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, जगभरात डीएपीच्या किमती वाढल्या असताना देशातील शेतकऱ्यांना १३५० रुपये प्रति पोती दराने डीएपी मिळत राहणार आहे

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या वाढत्या किमतींचा भारतातील शेतकऱ्यांवर परिणाम होऊ देणार नाही, असा निर्धार सरकारने केला आहे. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY-AIBP) अंतर्गत उत्तराखंडच्या जमराणी धरण बहुउद्देशीय प्रकल्पाचा समावेश करण्यास मंजुरी दिली. त्याचा फायदा उत्तराखंड आणि यूपीतील शेतकऱ्यांना होणार आहे.

हे आहेत रब्बी हंगामातील भाव

आगामी रब्बी हंगामात युरियासाठी ४७.२ रुपये प्रति किलो, फॉस्फरससाठी २०.४२ रुपये प्रति किलो, पोटॅशसाठी २.३८ रुपये प्रति किलो आणि सल्फरसाठी १.८९ रुपये प्रति किलो अनुदान देण्यात येणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. यासाठी एकूण २२ हजार ३०३ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. जुन्या डीएपीच्या दरानुसार प्रति बॅग केवळ १३५० रुपये मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय NPK १४७० रुपये प्रति बॅग या किमतीत मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

Subsidized Electricity Scheme: कृषिपूरक व्यवसायांना लवकरच सवलतीच्या दराने वीज

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

SCROLL FOR NEXT