Soil Testing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Soil Testing : 'माती परीक्षणाने आधुनिक शेती केल्यास उसाचे उत्पन्न वाढेल'

Soil Testing : चांगल्या प्रतीच्या रोपांची निवड, लावण, खत व पाणी व्यवस्थापन योग्य पध्दतीने केल्यास अधिकाधिक उत्पादन घेणे शक्य आहे असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane production : ‘कोल्हापूर जिल्हा ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. पण उत्पादन क्षमता एकरी तीस टनच आहे. माती परीक्षण आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय खते वापरल्यास ऊस उत्पादन दुप्पट होईल. माती परीक्षण करून आधुनिक ऊस शेती केल्यास उत्पादनवाढ होईल, असे सल्ला कृषी संशोधक अरुण देशमुख यांनी दिला.

सडोली खालसा (ता. करवीर) येथे पांडुरंग सांस्कृतिक भवनमध्ये भोगावती साखर कारखान्याच्या वतीने आयोजीत आधुनिक शेती चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रावसाहेब बुगडे होते.

अरुण देशमुख म्हणाले, ‘ऊस पिकावर अनेक व्यवसाय चालले असून उस हे औद्योगिक पीक आहे. नैसर्गिक बदलातही खात्रीशीर पीक म्हणून ओळखले जाते. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास न धरल्याने एकरी तीस टन ऊस उत्पादन मिळत आहे. हे बदलण्यासाठी साडे पाच फुटाची सरी, जमिनीची सुपिकता, सेंद्रिय कर्ब वाढ, रूंद सरी पद्धतीने लागवड, दर्जेदार बेणे निवड, बेणे प्रक्रिया, शिफारशीत खत मात्रा, या सुत्रांचा वापर करावा.

तसेच जमिनीतून पाण्याचा निचरा झाला पाहिजे, एकरी दहा टन शेणखत द्यावे, जमिनीतील कर्ब वाढवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी जीवानू संवर्धन खते दिली पाहिजेत. उसाच्या विक्रमी उत्पादनासाठी जमिनीच्या पूर्वमशागतीपासून तोडणीपर्यंत नियोजन महत्त्वाचे आहे. चांगल्या प्रतीच्या रोपांची निवड, लावण, खत व पाणी व्यवस्थापन योग्य पध्दतीने केल्यास अधिकाधिक उत्पादन घेणे शक्य आहे असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.

यावेळी करवीर तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार यांनी शेतकरी गोपानाथ मुंडे शेतकरी विमा व अन्य योजनांची माहिती दिली. प्रगतशील शेतकरी दिनकर पाटील, करवीरचे कृषी अधिकारी बंडा कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील, शेती विकास अधिकारी साताप्पा चरापले, यांनी मनोगते व्यक्त केली.

भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजू कवडे, केरबा पाटील, अक्षय पवार पाटील, शिवाजी कारंडे, धैर्यशील पाटील, बाबासाहेब देवकर, धीरज डोंगळे, अमित कांबळे, विलास पाटील, यांच्यासह भोगावती परिसरातील शेतकरी सर्व संचालक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Shortage : युरिया टंचाईवर ग्रीन अमोनियाची मात्रा?

Manikrao Kokate Controversy : बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना

MSP Committee : हमीभाव समितीच्या तीन वर्षांत सहा बैठका

Atal Pension Yojana : आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून?

Maharashtra ITI upgrade : राज्यातील शंभर ‘आयटीआय’चे बळकटीकरण करणार

SCROLL FOR NEXT