Sugar Factory Election Agrowon
ॲग्रो विशेष

Ganesh Cooperative Sugar Factory Election : गणेश कारखान्यामधील पराभवानंतर आमदार लंकेचे मंत्री विखेंना टोमणे

Team Agrowon

Nagar News : राहाता तालुक्यातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनेलचा पराभव झाल्याचे कळताच पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी थेट राहाता गाठून विजयी संचालकांचे स्वागत केले.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीकडून नीलेश लंके लढणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे व आमदार नीलेश लंके यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला असून, एकमेकांना बोलण्याची एकही संधी ते सोडताना दिसत नाहीत.

राहाता-शिर्डी हा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला आहे. नगर जिल्ह्यात सहकारी साखर कारखानदारी महत्त्वाची मानली जात आहे.

राहाता तालुक्यातील गणेशनगर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनेलचा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे नातू व जिल्हा बंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या पॅनेलने पराभव केला.

सोमवारी (ता. १९) निकालानंतर १९ पैकी १८ जागेवर विखे यांचा पराभव झाल्याचे कळताच पारनेरचे आमदार नीलेश लंके थेट राहात्यात पोहोचले. तेथे त्यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत करत विखेंवर निशाण साधला.

गणेश कारखान्यात झालेला पराभव म्हणजे विखे पाटील यांच्या दडपशाहीला फुलस्टॉप आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातले पार्सलही परत पाठवणार असल्याची टीका त्यांनी केली.

विखे यांच्या यापूर्वीच्या भाषणाचा उल्लेख करत नीलेश लंके यांना आमदार व्हायची इच्छा दिसत नाही का, असा प्रश्‍न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता. त्याच वाक्याचा धागा पकडून लंके यांनी विखे यांच्यावर टीका केली. मला आमदार करायचे का नाही हे पारनेरची जनता ठरवेल, परंतु तुमच्या मुलाला खासदार करायचे की नाही, ते आता आम्ही ठरवू असा टोलाही त्यांनी लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT