Aditi Tatkare Agrowon
ॲग्रो विशेष

Aditi Tatkare : 'मी स्वतः जातीने लक्ष ठेवून', आदिती तटकरेंनी 'लाडकी बहिण योजने'च्या निकषांबाबतचे पत्रकच केलं सोशल मिडीयावर व्हायरल

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल सध्या अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यावरून विरोधकांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यातील निकषांमध्ये बदल केले जातील असा संभ्रम पसरवला जात आहे. यावरून माजी मंत्री तथा विद्यमान आमदार आदिती तटकरे यांनी महिला व बालकल्याण विभागाचे स्पष्टीकरण असणारे पत्रकच सोशल मिडीयावर टाकले आहे. तसेच त्यांनी, याबाबत कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे.

राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करणार. निकष लावून अनेक महिलांना अपात्र करणार आहे. प्रशासकीय स्तरावर लवकरच अपात्र महिलांना मेसेज केले जातील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. याबाबत सध्या राज्यात रिल्स आणि व्हिडिओ फिरवले जात आहेत. यामुळे राज्यातील हजारो-लाखो महिलांमध्ये चिंता पसरली आहे.

आदिती तटकरे यांनी, लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण देताना सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी, राज्यात ही योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती दिली आहे. तसेच याबाबत राज्याच्या महिला व बालविकाल विभागाने देखील परिपत्रक काढले आहे. हेच परिपत्रक त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केले आहे.

त्यांनी, मी एक महिला लोकप्रतिनिधी असल्याने स्वत: जातीने लाडकी बहीण योजनेवर लक्ष ठेवून आहे. यामुळे समाज माध्यमांवरील अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.

दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहीण योजनेवरून मुस्लिम समाजातील महिलांना लक्ष केले. त्यांनी, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या मुस्लिम समाजातील महिलांना दोन अपत्य असतील तरच लाभ देण्यात यावा, असा पवित्रा घेतला आहे. तर याबाबत आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही म्हटले आहे. नितेश राणे यांनी, मुस्लिम महिलांची योजना रद्द करून त्यांच्याऐवजी हिंदूना लाभ द्यावा, असेही म्हटले आहे.

यावरून आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. नितोश राणे यांच्या वक्तव्यावरून आमदार सत्यजित तांबे यांनी पलटवार केला आहे. तांबे यांनी, आपल्या देशातील कायदा स्पष्ट असून हे कायद्याचे राज्य आहे. येथे हिंदू कायदा वेगळा किंवा मुस्लिम कायदा नाही. कायदा प्रत्येकाला समान असून तो संविधानाने केला आहे. यामुळे कायद्याच्या चौकटीतच सरकारने निर्णय घेतला पाहिजे, असेही सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी

FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात

Farm Loan Waiver Lists: दर पंधरा दिवसांनी कर्जमाफीच्या याद्या येणार: मुख्यमंत्री फडणवीस

Wheat Export Ban Lifts: केंद्र सरकारने गहू निर्यातीवरील बंदी उठविली

Pune Rain: घाटमाथ्यावर तुरळक सरी

SCROLL FOR NEXT