Guidelines on agri infra fund may be tweaked to make it need-based 
ॲग्रो विशेष

Agri Based Business : ‘मिशन भगीरथ प्रयास’मुळे शेतीपूरक व्यवसायांची वाढ

Agro Business : जिल्हा परिषदेच्या ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रमाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे काठीपाडा (ता. सुरगाणा) येथे शेती व पूरक व्यवसायांची वाढ झाली आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रमाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे काठीपाडा (ता. सुरगाणा) येथे शेती व पूरक व्यवसायांची वाढ झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी या गावात सुमारे ५०० लिटर दूध संकलन व्हायचे. आता याच गावातून ३५०० लिटर दुधाचे संकलन होत असल्याने संकलनात सहापटींनी वाढ झाली आहे. तर भूजल पातळी वाढल्याने आता टोमॅटो, काकडी यांसह पालेभाज्या उत्पादन घेत आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २०२२ मध्ये मिशन भगीरथ प्रयास उपक्रम सुरू झाला. कायम पाणी टंचाई व दुष्काळ सदृश परिस्थिती असणाऱ्या गावांमधील भूजल पातळी वाढविण्याच्या मुख्य हेतू होता. यात काठीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीची निवड झाली. उपक्रमाच्या माध्यमातून दोन बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली.

भूजल पातळी वाढल्याने शेती व पूरक व्यवसायांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. येथील प्रमुख व्यवसाय हा भातशेती होता, आता भाजीपाला पिके घेतली जात आहेत. पूर्वी पावसाळ्यानंतर सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे शेतात खरिपानंतर पीक घेतली जात नव्हते. परिणामी, रोजगारासाठी लोक स्थलांतर करीत होते.

मात्र ‘मिशन भगिरथ प्रयास’ उपक्रमामुळे गावात भूजल पातळी वाढल्याने आता मात्र भात शेती बरोबरच गावकरी टोमॅटो, काकडी, पालेभाज्या यांचे उत्पादन घेत आहेत. यामुळे शेती उद्योगास चालना मिळाली आहे. शेतकऱ्यांना बारमाही काम मिळाल्यामुळे स्थलांतरण कमी झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

मिशन भागीरथ प्रयास उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात ३०७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली. या वर्षात अजून दोनशे बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. नागरिकांनी देखील ‘मनरेगा’ योजनेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आपल्या गावात जलसंधारणाची कामे करावी.
- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक
मिशन भगीरथ प्रयास उपक्रमामुळे भूजल पातळी वाढली आहे. शेती आणि पूरक व्यवसायांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. सुरगाणा तालुक्यात अजून बंधारे बांधल्यास पाणी संकट दूर होऊन सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.
- रोहिणी वाघेरे, सरपंच, गोपाळनगर, काठीपाडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT