Minister Pratprao Jadhav Agrown
ॲग्रो विशेष

Central Government Scheme : केंद्रीय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करा

Minister Pratapraon Jadhav : जाधव यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी सिंचन प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन आणि भूसंपादन प्रक्रियेची माहिती घेतली.

Team Agrowon

Buldana News : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी विभाग प्रमुखांना दिले.

जिल्ह्यातील केंद्रीय योजनांच्या प्रगती आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता.२९) जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार जाधव होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, प्रकल्प अधिकारी राजेश इंगळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जाधव यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी सिंचन प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन आणि भूसंपादन प्रक्रियेची माहिती घेतली. भूसंपादन प्रक्रियेबद्दल लोकांच्या तक्रारींचे निराकरण करावे. प्रकल्पबाधितांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे.

बुडीत क्षेत्रातील बाधितांचे ज्या ठिकाणी पुनर्वसन केले जात आहे त्या ठिकाणी रस्ते, पाणी, वीज आदी पायाभूत सुविधा असाव्यात. जिगांव सिंचन प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे, असे सांगितले.

पीकविमा होणार जमा

श्री. जाधव यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेचाही आढावा घेतला. २०२३-२४ वर्षात जिल्ह्यातील सुमारे चार लाख ५० हजार शेतकऱ्यांना ४५३ कोटी रुपये रक्कमेचा पीकविमा मंजूर झाला होता.

त्यातील ४२९ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरीत २४ कोटी रुपये शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक नसणे व इतर कारणांमुळे जमा झाले नव्हते. ती नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.

या शिवाय सन २०२४-२५ च्या खरीप हंगामात १४४ कोटी रुपये पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पीक पैसे जमा होणार असल्याची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat : शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Flood Damage Relief: पशुधनासाठी राज्य सरकारची मदत जाहीर; प्रति दुधाळ जनावरासाठी मिळणार ३७ हजार ५०० रुपये

Devendra Fadanvis Live : अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा

Maharashtra Crop Damage: 'जमीन खरडून गेली, सुपीकता, उत्पादकतेवर दीर्घकालीन परिणाम, शेती पूर्वपदावर येण्यासाठी ५ वर्षे लागतील?'

Farm Mechanization : कृषी यांत्रिकीकरण योजनेत चालढकल करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT