Kolhapur Soybean Rate agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Soybean Rate : हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्रीसाठी नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Soybean Rate : आधारभूत किंमत खरेदी योजना २०२४-२५ अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करीता शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत खरेदी केंद्रावर समक्ष जाऊन नोंदणी करावी

sandeep Shirguppe

Soybean Base Price Purchase Scheme : आधारभूत किंमत खरेदी योजना २०२४-२५ अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत खरेदी केंद्रावर समक्ष जाऊन नोंदणी करावी, असे अवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी गजानन मगरे यांनी शुक्रवारी पत्रकाद्वारे केली.

आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्यादित तालुका आजरा (केंद्र-आजरा), कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग खरेदी विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर (केंद्र कोल्हापूर मार्केट यार्ड), श्री अन्नपूर्णा सह. सोयाबीन खरेदी विक्री संस्था मर्या व्हनाळी (केंद्र-कागल) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी नोंदणी सुरू असल्याची माहिती गजानन मगरे यांनी दिली.

शासनाने सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणी करिता शेतकऱ्यांचा चालू (२०२४-२५) हंगाम मधील ऑनलाईन सोयाबीन पिकपेऱ्यांची नोंद असलेला ७/१२ उतारा, आधार कार्डची झेराक्स, बँक पासबुक आवश्यक आहे. संबंधित ठिकाणी जाऊन नोंदणी करणे गरजेचे असून नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात येईल असे सांगण्यात आले.

अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथे संपर्क करावा असेही मगरे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beekeeping Business: मधुमक्षिका पालन; कमी खर्चात जास्त नफा देणारा शेतीपूरक व्यवसाय!

Farmer Protest: पातुर्डा येथे राज्यव्यापी हक्क परिषदेत शेतकरी नेते कडाडले

Agrowon Diwali Article: सुखी माणसाचा सदरा गवसतो तेव्हा...

Sugarcane Worker Issue: ऊस तोडणी कामगारांना फरक न दिल्यास संप

Development Project: मावळ तालुका कृषी विकासाचा आदर्श बनेल : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT