Milk Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दूध दराचा भडका; विधीमंडळासमोर दूध ओतून शेतकऱ्यांनी केलं आंदोलन

Milk Farmers Protest : केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे संतप्त दूध उत्पादकांनी शुक्रवारी (ता.२८) विधीमंडळाच्या बाहेर दूध ओतून आंदोलन केलं.

Dhananjay Sanap

Vidhanbhavan Milk Protest : केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे संतप्त दूध उत्पादकांनी शुक्रवारी (ता.२८) विधीमंडळाच्या बाहेर दूध ओतून आंदोलन केलं.

१० हजार दूध पावडर का केला जात आहे? असा प्रश्न दूध उत्पादक शेतकरी करत आहेत. मागील वर्षभरापासून दूध उत्पादक शेतकऱ्यांची मेहनत राज्य सरकार नासवत आहे. त्यात आता केंद्र सरकारच्या दूध पावडर आयातीच्या निर्णयामुळे दूध उत्पादकांमध्ये सार्वत्रिक संतापाची भावना आहे.

त्यामुळे शेतकरी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. तर किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

शेट्टी म्हणाले, " पावडरची किमती कमी झाल्यामुळे पावडर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दूध खरेदी दर २४ ते २५ रुपयांवर आणले आहेत. त्यामुळे सरकारने दूध पावडर कंपन्यांवर सरकारने नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्यात दूध पावडर आयातीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप का घेतला नाही?" असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, राज्य सरकारने दूध पावडर कंपन्यांच्या हिताचा निर्णय घेऊन मलमपट्टी करू नये. राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

राज्य सरकारने शनिवारी दूध प्रश्नावर बैठक बोलवली आहे. यावर किसान सभेचे नेते अजित नवले यांनी टीका केली आहे. नवले म्हणाले,"दूध उत्पादकांना ४० रुपये दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

त्यात दूध पावडर आयात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. त्यामुळे आता सरकारने अंत न पाहता राज्य सरकारने हस्तक्षेप करावा. राज्य सरकारने आपल्या सोयीची माणसं बैठकीत बोलवली आहेत. नुसत्या बैठका बोलवून प्रश्न सुटणार नाही." असंही नवले म्हणाले.

दरम्यान, उन्हाळ्यात दुधाचे भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु खाजगी दूध संघांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध पावडरच्या किमतीत घट झाल्याचं कारण देऊन दूध दरात कपात केली. दूध खरेदी दर २५ रुपयांवर आणले.

त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे राज्यातील विविध भागात शेतकऱ्यांनी आंदोलन आणि मोर्चाला सुरुवात केली आहे. गुरुवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात दूध प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी उडण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Prices : कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; आंध्र प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय

CM Annapurna Yojana: घरगुती वापरासाठी मिळणार दरवर्षी ३ मोफत गॅस सिलिंडर; महिलांसाठी राज्य सरकारची योजना

Kashmir Fruit Crisis: काश्मीरच्या फळ उत्पादकांचे मोठे नुकसान; जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद

Grass Selling: गवताच्या भाऱ्याचा आधार

Agrowon Podcast: आल्याच्या दरातील तेजी टिकून; कापसाचे भाव दबावातच, सोयाबीनचे दर स्थिरावले, लाल मिरचीची आवक मर्यादीत तर शेवग्याला चांगला उठाव

SCROLL FOR NEXT