Maharashtra Milk agrowon
ॲग्रो विशेष

Milk Collection : दूध संकलनाची माहिती द्या, अन्यथा कारवाई करू; नाशिक जिल्हा परिषदेचा इशारा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान नाशिक जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दूध संकलन केंद्रांना आदेश काढत, 'दूध संकलनाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाना द्या', असे म्हटले आहे. तसेच 'ज्या संस्था माहिती देत नाहीत किंवा देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करा', अशा सूचना देखील जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांच्या लढ्याला यश आले आहे. तर  दूध संकलन केंद्रांना दूध संकलनाची माहिती ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक असणार आहे. 

नाशिक जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासह होणारी दूध भेसळ रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. तर सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी देखील लढा दिला आहे. तर त्यांनी यावरून अनेक वेळा उपोषण केले आहे. 

तसेच बैरागी यांनी, 'दूध संकलन केंद्रानी दूध संकलनाच्या माहितीसह पुढे पाठवण्यात येणाऱ्या दूधाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात यावी अशी मागणी लावून धरली होती. याबाबत बैरागी यांनी, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्याकडे पाठपूरावा केला होता. तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले होते. 

दरम्यान आता जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दूध संकंलन केंद्राच्या बाबत आदेश काढले आहेत. तर दूध संकलनाची माहिती ग्रामपंचायतीला देण्याबाबत जिल्ह्यातील दूध संकंलन केंद्राना माहिती द्या, अशा सूचना गटविकास अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

तसेच जी दूध संकलन केंद्र माहिती देत नाहीत किंवा जे देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना देखील गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रांना दूध संकलनासह पुढे पाठवण्यात येणाऱ्या दूधाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयास देणे बंधनकारक असणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT