Milk Rate : दुधाच्या दराबाबत दुग्धविकास मंत्र्याकडूनच शेतकऱ्यांची दिशाभूल

Dairy Business : राज्यात दुधाचे दर वरचेवर कमी केले जात आहेत. राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती, पाणी, चाराटंचाईमुळे दूध व्यवसाय जपणे जिकिरीचे झाले आहे.
Milk Rate
Milk RateAgrowon
Published on
Updated on

Nagar News : ‘‘राज्यात दुधाचे भाव सातत्याने कोसळत असताना, शेतकरी श्रीमंत होणार, शेतकऱ्याला दुधाचे पैसे मिळणार, मार्चअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार, अशी जाहिरातबाजी करून राज्याचे दुग्धविकास तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत आहेत.

शेतकऱ्यांची ही दिशाभूल आहे,’’ असा आरोप किसान सभेचे नेते व दूध उत्पादक संघर्ष समितीचे राज्याचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केला आहे. डॉ. अजित नवले यांनी सांगितले, की राज्यात दुधाचे दर वरचेवर कमी केले जात आहेत.

Milk Rate
Milk Rate : कमी दूधदरामुळेच शेतकरी अनुदानापासून वंचित

राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती, पाणी, चाराटंचाईमुळे दूध व्यवसाय जपणे जिकिरीचे झाले आहे. दुधाचे दर कमी झाले म्हणून शेतकऱ्यांना प्रति गाईच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची सरकारने घोषणा केली.

Milk Rate
Milk Rate : गायीच्या दूध खरेदी दराबाबत सरकारचे घुमजाव

मात्र अटी, शर्ती व ऑनलाइन डेटाच्या जटिलतेमुळे शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. अशा पार्श्‍वभूमीवर दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पाच रुपयांच्या न मिळालेल्या अनुदानाच्या जोरावर शेतकरी श्रीमंत होणार असल्याच्या जाहिराती करत असतील तर यापेक्षा अधिक खेदजनक दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही.

राज्यातले सरकार व दुग्धविकासमंत्र्यांचा अशा जाहिरातीबाबत, असंवेदनशीलतेबाबत तसेच निष्क्रियतेबाबत करावा तेवढा निषेध थोडा आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यायचे सोडून अशा जाहिराती करत शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा प्रकार आहे,’’ असे सांगून नवले यांनी शासन व दुग्धविकासमंत्र्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रति असलेल्या असंवेदनशीलपणाचा निषेध केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com