Earthquake  Agrowon
ॲग्रो विशेष

Earthquake : अमरावतीच्या चिखलदरा, धारणी, परतवाडा, अंजगाव सुर्जी तालुक्यातील अनेक भागांना भूकंपाचे सौम्य धक्के

Earthquake hits Maharashtra’s Amravati: अमरावती जिल्ह्यातील विविध ठिकाणी सोमवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे येथे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, धारणी, परतवाडा, अंजगाव सुर्जी तालुक्यातील अनेक भागांना सोमवारी (ता. ३०) भूकंपाचे सौम्य धक्के बसले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तर घरातील वस्तू हालू लागल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने भूकंप सौम्य धक्क्यांचा असल्याने वित्त किंवा जीवित हानी झालेली नाही.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, धारणी, परतवाडा, अंजनगाव सुर्जी तसेच मेळघाटातील काही गावांमध्ये भूकंपाचे रविवारी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली.

भूकंपाचे केंद्र अचलपूरपासून ४०० मीटर दूर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर केंद्राच्या जवळ असणाऱ्या अचलपूर आणि परतवाडा या शहरांमध्ये सर्वाधिक भूकंपाचे धक्के जाणवले.

दरम्यान अचलपूर, अंजनगाव सुर्जी., चिखलदरा, धारणी या तालुक्यांसह मेळघाटातील अनेक गावांमध्ये भूकंपामुळे खळबळ उडाली. चिखलदरा तालुक्यातील अनेक गावातील लोक हादऱ्यांमुळे घराबाहेर पडले. तसेच भूकंपाचे सौम्य प्रकारचे धक्के लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वित्त किंवा जीवित हानी नाही

अमरावती जिल्ह्यात झालेला भूकंप हा सौम्य होता. यामुळे येथे कोणत्याही प्रकारची वित्त किंवा जीवित हानी झालेली नाही. पण या भूकंपाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT