Labor Migration Agrowon
ॲग्रो विशेष

Labor Migration : अल्पभूधारक शेतकरी, मजुरांचे कामाच्या शोधात स्थलांतर

Agriculture Crisis : निसर्गाच्या अवकृपेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मजूर होण्याची वेळ आली आहे. शेतीत अपेक्षेप्रमाणे पिकत नसल्यामुळे अल्पभूधारकांना स्थलांतर करावे लागत आहे.

Team Agrowon

किरण भवरे

Pune News : बदलत्या वातावरणामुळे अतिवृष्टी, गारपीट, सततचा पाऊस आणि कीड-रोगांनी अपेक्षित पीकपाणी नाही. दोन वर्षांपासून याचा फटका शेतकऱ्यांसह मजुरांनाही बसत आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा यासोबत राज्यभरातून अल्पभूधारक शेतकरी, मजूर पुणे, मुंबईकडे कामाच्या शोधात येत आहेत. दुष्काळाच्या वाढत्या दाहकतेमुळे पुण्यातील भोसरी, दिघी येथील मजूर अड्ड्यांवर काम मिळविण्यासाठी ते धडपडताना दिसत आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मजूर होण्याची वेळ आली आहे. शेतीत अपेक्षेप्रमाणे पिकत नसल्यामुळे अल्पभूधारकांना स्थलांतर करावे लागत आहे. तर काही शेतकरी हंगामी मजूर म्हणून काम करीत आहे. शेतकऱ्यांचीच आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे शेतमजुरांची तर त्यापेक्षा वाईट अवस्था झाली आहे.

मजुरांना इमारतींचे बांधकाम, सोसायटीची व घरांची विविध प्रकारची कामे, प्लम्बिंगची कामे, बांधकाम साहित्याची ने-आण करणे, महिलांना पॅकिंगची कामे, छोट्या व्यवसायासाठी साहित्याची ने-आण करणे, अशी कामे मिळतात. बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीला आठशे रुपये रोजंदारी मिळते. तर त्यांना सहायक म्हणून काम करणाऱ्यांना साधारण पाचशे रुपये रोजंदारी मिळते.

भोसरी येथील मजूर अड्ड्यावर कामाच्या शोधात असलेले अल्पभूधारक शेतकरी तुकाराम भिकाजी गायकवाड (वय ५५) बांधकाम मजूर म्हणून काम करतात. बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा (ता. मेहकर) येथून आलेले आहेत. ते म्हणतात, की माझ्याकडे ५ एकर शेती आहे. शेतीपिकांचा हंगाम संपला, की मी पुण्यात कामाला येतो.

मी काम करून कुटुंबाला हातभार लावतो. मजुरी करताना दररोज हाताला काम मिळतेच याची गॅरंटी नाही. अशा मजुरांची संख्या येथे दिवसेंदिवस वाढत आहे. यात विदर्भ, मराठवाड्यातून येणारे अधिक आहेत. त्यात परप्रांतीयांची देखील भर पडत आहे.

पुण्यात दोन वर्षांपासून आलेले गणेश संपत जाधव (वय ४५) मूळचे आणवा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील आहेत. ते म्हणाले, की मला एक एकर शेती आहे. ती ठोक्याने दिली आहे. त्यात खरिपाच एक पीक येत. त्यानंतर काही पिकत नाही. अगोदर गावाकडे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होतो.

पण आता भोसरी एमआयडीसीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहे. एका मुलीच लग्न झालं आहे. एक मुलगा, दोन मुली आणि पत्नीसह येथे राहतो. माझी पत्नीही एमआयडीसीत कामाला जाते. लेकरं शाळेत जातात. त्यांच शिक्षण महत्त्वाचं आहे. गावापेक्षा शहरात हाताला काम लवकर मिळते म्हणून आलो आहे.

मजूर महाराष्ट्रातील असो की परराज्यांतील त्यांची परिस्थिती सारखीच आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथून आलेला अरविंद ठाकूर (वय २६) दिघी येथील मजूर अड्ड्यावर भेटला. तो म्हणाला, की दोन वर्षांपूर्वी येथे कामाच्या शोधात आलो. येथे हाताला काम आहे. रोजीरोटीचा प्रश्‍न मिटावा यासाठी माझं घर मला सोडावं लागलं. माझं शिक्षण अकरावीपर्यंत झालं. फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे शिक्षण अर्धवट राहील. आता मजुरी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे.

तरुणाईचीही पावले शहराकडे

पदभरतीच्या आता फारशा शासकीय जाहिराती निघत नाहीत. पर्यायी कंत्राटी भरती देखील नाही. तसेच कुटीरोद्योग आणि छोट्या व्यावसायासाठी भांडवल उपलब्ध होत नसल्याने कामाच्या शोधात येत आहेत. अल्पशिक्षित तरुण-तरुणी मोलमजुरी करीत आहेत. तर बारावी ते पदवीपर्यंत झालेले छोट्या, मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत. यामध्ये उच्चशिक्षित तरुणही आहेत.

विदर्भ-मराठवाड्यातून सर्वाधिक स्थलांतर

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातून सर्वाधिक स्थलांतर होत आहे. यंदा झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांची हानी झाली. त्यामुळे मजुरांच्या हातालाही काम उरले नाही. पर्यायी त्यांनी स्थलांतर करण्याचे पसंत केले आहे.

शहरात मजुरी अधिक

बांधकाम मजूर पुरुषांना सातशे ते आठशे रुपये मजुरी मिळते. तर महिलांना पाचशे रुपये मजुरी मिळते. शेतीकामांपेक्षा ही मजुरी अधिक असल्याचे त्यांना समाधान आहे. पण अंगमेहनतीचे काम असल्याची मनात सलही आहे. तर हाताला दररोज काम नाही याच दुःख अधिक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT