Micronutrient Management Agrowon
ॲग्रो विशेष

Micronutrient Management : रब्बी पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Crop Nutrients : पिकाला काही अन्नद्रव्यांची गरज ही अत्यंत सूक्ष्म प्रमाणात असते, या घटकांची गरज अत्यंत कमी प्रमाणात असली तरी पिकांच्या एकूण वाढीमध्ये व उत्पादनात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही अन्नद्रव्ये पिकांमधील अनेक मूलभूत प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.

Team Agrowon

डॉ. शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे

Integrated Nutrient Management : महाराष्ट्रातील जमिनींमध्ये प्रामुख्याने जस्त (३९ %) व लोह (२३ %) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते. जमिनीत माती परीक्षणानुसार जस्त ०.६ पीपीएम पेक्षा कमी असल्यास आणि लोह ४.५ पीपीएम पेक्षा कमी असल्यास कमतरता समजावी.

ही कमतरता विशेषतः जास्त विम्ल प्रकारचा सामू (८.५ पेक्षा जास्त), जास्त क्षारता (०.५ डेसी सायमनपेक्षा जास्त), चुनखडीयुक्त (१० % पेक्षा जास्त) व कमी सेंद्रिय कर्ब (०.४० % पेक्षा कमी) असलेल्या जमिनींमध्ये दिसून येते. यामुळे विविध पिकांवर कमतरतेची लक्षणे दिसून येतात. परिणामी पिकाचे उत्पादन आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतात.

पिकाला काही अन्नद्रव्यांची गरज ही अत्यंत सूक्ष्म प्रमाणात असते, म्हणूनच त्याला सूक्ष्म अन्नद्रव्ये असे म्हणतात. या घटकांची गरज अत्यंत कमी प्रमाणात असली तरी पिकांच्या एकूण वाढीमध्ये व उत्पादनात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही अन्नद्रव्ये पिकांमधील अनेक मूलभूत प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. (उदा. वनस्पतीमध्ये उत्प्रेरक, संप्रेरक निर्मितीचे कार्य, हरितद्रव्य निर्मिती, फूल व फळधारणेस मदत आणि प्रथिने तयार करणे इ.)

म्हणूनच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकाला भासल्यास पिकाला पुरविलेल्या अन्य मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते. या लेखामध्ये आपण रब्बी हंगामातील काही प्रमुख पिकांमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे जाऊन कोणत्या उपाययोजना करायच्या याची माहिती घेऊ.

गहू

अ) जस्त

कमतरतेची लक्षणे ः

पिकाची एकंदर वाढ खुंटते. कमतरता तीव्र असेल तर पाने पांढरे होऊन मरतात. 

गहू रोपांमध्ये जस्ताच्या कमतरतेचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे वनस्पतींची उंची आणि पानांचा आकार लक्षणीयरित्या कमी होतो. 

ही लक्षणे मध्यमवयीन पानांवर पांढऱ्या - तपकिरी जळल्यासारख्या डागांच्या स्वरूपात दिसून येतात. पानांचा मधला भाग  झिजल्याप्रमाणे दिसतो.

ब) लोह

कमतरतेची लक्षणे

लहान पानांवर विशिष्ट पिवळे हिरवे पट्टे असलेला मध्यवर्ती केवडा दिसू लागतो. 

संपूर्ण पाते पिवळे होते. केवडा किंवा हरित रोग जुन्या पानांवरदेखील पसरतो.

ज्वारी व मका

अ) जस्त

कमतरतेची लक्षणे

रोपाचा रंग फिकट हिरवा दिसू लागतो.

पानाच्या खालच्या अर्ध्या भागात फिकट पिवळ्या रंगाचे उभे पट्टे दिसू लागतात. कालांतराने ते फिकट तपकिरी किंवा राखाडी होऊन पेशीसमूहाचा काही भाग नष्ट होतो.

ब) लोह

कमतरतेची लक्षणे

शिरांच्या मधल्या भागात केवडा होऊन पेशीसमूहाचा काही भाग नष्ट होतो. पानाच्या संपूर्ण पात्यावर शिरा अगदी ठळक दिसू लागतात.

हरभरा

अ) जस्त

कमतरतेची लक्षणे

झिंकची कमतरता असलेली रोपे खुंटलेली दिसतात. अशा रोपांवर शाखा कमी असतात.

पिकाच्या परिपक्वता कालावधीत वाढ होते.

लहान पाने प्रथम फिकट गुलाबी व हिरवी होतात, नंतर लालसर तपकिरी होतात.

पानांच्या कडांवर आणि देठाच्या खालच्या भागात विकृती दिसून येते.

गंभीर कमतरतेत, पान गडद कांस्य रंगाचे होऊन पेशीसमूहाचा काही भाग नष्ट होतो.

ब) लोह

कमतरतेची लक्षणे

सर्वप्रथम नवीन पानांवर कमतरतेची लक्षणे दिसतात. नवीन पाने कालांतराने गडद पिवळी होऊन शेवटी पांढरी पडतात. जुनी पाने गडद हिरवी राहतात.

नवीन पानांमध्ये जळाल्यासारखे डाग सुमारे पानाचा अर्धा भाग व्यापतात.

पुढील टप्प्यात हे डाग संपूर्ण पानावर पसरतात. पाने एकतर मरतात, नाहीतर गळून पडतात.

कांदा

अ) जस्त

कमतरतेची लक्षणे

ही कमतरता  सहज लक्षात येते. पाने कमजोर होऊन शिरांमधील हरितरोग स्पष्ट दिसू लागतो.

कांदा हे पीक  जस्ताच्या कमतरतेला अतिशय संवेदनशील असतो. पानांची पाती वेणीसारखी दिसू लागतात. रोपांची कोवळी पाने पिवळसर हिरव्या रंगाची होऊन जुन्या पानांवर शेंड्याकडून मर सुरू होतो.

पानांच्या जमिनीकडील भागावरील पेशी हरित रोग/ केवडा होऊन मृत पावतात.

ब) लोह

कमतरतेची लक्षणे

नवीन पानांमध्ये संपूर्ण पिवळेपणा दिसू लागतो.  लोहाच्या कमतरतेचे  सर्वात सामान्य लक्षण  म्हणजे सर्वात लहान पानांच्या मधील भागावर केवडा रूपात, एक संपूर्ण हरीतरोग विकसित होतो आणि पाने मृत पावतात.

लोहाची गतिशीलता कमी  असल्याने , नवीन पानांवर  लोहाची कमतरता दिसून येते.

जस्ताच्या कमतरतेवर उपाययोजना

गहू :

पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट ८ किलो प्रति एकर ही शिफारस खत मात्रेसोबत किंवा शेणखतासोबत द्यावे.

उभ्या पिकात कमतरता दिसून येताच, साधारणपणे ३५ दिवसांनी चिलेटेड जस्त (Zn-EDTA) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

ज्वारी व कांदा :

पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट ८ किलो प्रति एकर ही शिफारस खत मात्रेसोबत किंवा ३० दिवसांनी एक आठवडा मुरवलेल्या शेणकाला स्लरीमध्ये मुरवलेली जस्त मात्रा पाण्यासोबत द्यावी. (प्रमाण ः ८ किलो झिंक सल्फेट + ४० किलो ताजे शेण + २०० लिटर पाणी.)

उभ्या पिकात कमतरता दिसून येताच. साधारणपणे ३० दिवसांनी चिलेटेड जास्त (Zn-EDTA) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

मका :

पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट १० किलो प्रति एकर शिफारस खत मात्रेसोबत किंवा ४० किलो शेणखत आठवडाभर मुरवून द्यावे.

उभ्या पिकात कमतरता दिसून येताच, साधारणपणे ३५ दिवसांनी चिलेटेड जास्त (Zn-EDTA) २० यवतमाळ विभाग बिनविरोध करण्याच्या हालचालीग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

लोहाच्या कमतरतेवर उपाययोजना (वरील सर्व पिकांसाठी)

पेरणीच्या वेळी फेरस सल्फेट १० किलो प्रति एकर शिफारस खत मात्रेसोबत किंवा ४० किलो शेणखतात आठवडाभर मुरवून द्यावे.

उभ्या पिकात कमतरता दिसून येताच साधारणपणे ३० - ३५ दिवसांनी चिलेटेड लोह (Fe-EDTA) १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

अशा प्रकारे मृद आरोग्य पत्रिकेत दर्शविल्याप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेची नोंद असल्यास प्रथमतः सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून करावा. पुढे उभ्या पिकात कमतरता लक्षणे दिसून येताच, वरील प्रमाणे चिलेटेड स्वरूपातील खतांची फवारणी आठवड्याच्या अंतराने दोन वेळा करावी.

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.

डॉ. शुभम दुरगुडे, ९०२१५९०१५०

(खासगी कंपनीत मृदाशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत.)

डॉ. अनिल दुरगुडे, ९४२०००७७३१ (मृदाशास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT