Well Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Well Fund : आडुळ येथील वैयक्तिक विहीर, गोठ्याचा निधी रखडला

Agriculture Scheme : आडुळ बु. पैठण येथे २०२४- २०२५ आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास १०० वैयक्तीक सिंचन विहिरी मंजूर झाल्या होत्या.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आडुळ (ता. पैठण ) येथे करण्यात आलेल्या वैयक्तीक विहीर, गायी गोठ्यासह इतर करण्यात आलेल्या कामाचा निधी सात ते आठ महिन्यापासून थकले आहेत. काम पूर्ण करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी व व्याजाने पैसे काढून काम केलेले असल्याने त्यांच्यावर कर्जाचे डोंगर उभे राहिले आहे.

आडुळ बु. पैठण येथे २०२४- २०२५ आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास १०० वैयक्तीक सिंचन विहिरी मंजूर झाल्या होत्या. यातील ६२ विहिरींचे काम पूर्ण झाले असून बिले सादर करून आठ महिने झाले. १५ गाय गोठे, ४ सिमेंट रस्ते व दहा पेव्हर ब्लॉक ची कामे पूर्ण होऊन अनेक महिने झाले तरी पंचायत समिती कार्यालय पैठण यांनी अद्यापपर्यंत कोणतीच बिले काढली नाही.

येथील विहिरीचे लाभार्थी, कचरू बीसन कोल्हे, शबाना मुनाफ शेख, शेख दाऊद शेख सांडू, विनायक धनू राठोड, सावित्राबाई गणेश कोल्हे, गणेश कडुबा भावले, दिलीप आनंदा पिवळ,असेफ रहेमान शेख, रामेश्वर श्रीमंत पिवळ यांच्यासह ६२ शेतकरी यांचे तर गायगोठे लाभार्थी देवा दलसिंग राठोड, विनायक लक्ष्मण पाटोळे, नामदेव अप्पा पिवळ, लताबाई राजेंद्र कासलीवाल यांच्यासह पंधरा शेतकरी यांचे कामे पूर्ण होऊन वर्षे होत आले आहेत.

पैठण तालुक्यातील देवगाव, ब्राम्हणगाव, एकतुनी, घारेगाव, हिरापूर, पारुंडी, कडेठाण, गेवराईसह अनेक गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरींचे कामे झालेली आहे. शासनाने तत्काळ पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी होत आहे.

कामे झालेल्या लाभार्थ्यांची बिले मागणी केलेली असून येत्या दोन महिन्यात बजेट येताच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.
- मनोरमा गायकवाड, गट विकास अधिकारी, पैठण.
माझ्या विहिरीचे काम पूर्ण होऊन वर्षे झाले. काम करण्यासाठी उसनवारी केली मात्र आता पैसे जमा होत नसल्याने लोकांनी तगादा लावला आहे.
- रामेश्वर पिवळ, विहिरीचा लाभार्थी शेतकरी.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सर्व लाभार्थ्याचे सगळे बिल ग्रामपंचायतीने पंचायत समितीला सादर केले आहे. तालुकास्तरीय सामाजिक लेखा परीक्षण प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला आहे.
- नारायण पाडळे, ग्राम विकास अधिकारी, आडुळ बु.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

Forest Fire: वनी वणवा पिसाटला

Maharashtra Politics: दानवेंच्या उमेदवारीवरून धुसफूस

SCROLL FOR NEXT