Farmer Death Measures Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Death Measures : मानसिक आरोग्य शिबिरे, समुपदेशन सेवांची स्थापना करणार

Farmers Problem : शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. बाजारपेठेत भाव मिळावा यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले गेले.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱी बुवनेश्वरी एस. यांनी बुधवारी (ता.१५) महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. त्यात अपुरे पर्जन्यमान, पिकांच्या नुकसानीसाठी अपुरी भरपाई, कर्जाचा बोजा, मार्केटमध्ये मिळणाऱ्या कमी भावाच्या मुद्यांवर चर्चा झाली.

शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. बाजारपेठेत भाव मिळावा यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले गेले.

असे घेतले काही महत्वाचे निर्णय

कृषी सल्लागार केंद्र : शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी तालुका पातळीवर कृषी सल्लागार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

तातडीने आर्थिक मदत : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत पुरवली जाईल.

मानसिक आरोग्य उपाययोजना : शेतकऱ्यांसाठी मानसिक आरोग्य शिबिरे आणि समुपदेशन सेवांची स्थापना केली जाईल.

कर्जमाफीचा विचार : जिल्ह्यातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारकडे अहवाल सादर केला जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; उन्हाचा चटका वाढला

Farmers Await Compensation: केळी, कांदा नुकसानीची भरपाई कधी मिळणार?

Nandurbar Water Storage: नंदुरबारात अनेक बंधारे, जलसाठे मुबलक

Sugar Industry: साखर उद्योग अडचणीत, समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी सरकारकडून समिती गठित

Groundnut Procurement: जामोदमध्ये उघड लिलाव पद्धतीने भुईमूग खरेदी सुरू

SCROLL FOR NEXT