Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये होणार बैठका आणि पंचायत सभा

Delhi Farmers protest : पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर गेल्या ३६ दिवसापासून शेतकऱ्यांचे आदोलन सुरू आहे. तर बुधवार (ता. २०) शेतकरी आंदोलनाचा ३७ वा दिवस असून आतापर्यंत १० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News :  पंजाब आणि हरियानातील शेतकरी दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तीन सीमांवर गेल्या ३६ दिवसापांसून आंदोलन करत आहेत. मात्र यावर केंद्र सरकारकडून कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही. तर जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. यादरम्यान हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये बैठका आणि पंचायत सभांचे आयोजन आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात येणार आहे. २२ ते ३१ मार्च या कालावधीत शेतकरी आपल्या मागण्यांबाबत सभा आणि पंचायतींचे आयोजन करतील. तसेच २३ मार्चला सरदार भगतसिंग यांच्या हौतात्म्य दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे. 

पंजाब आणि हरियानातील शेतकरी हमीभाव कायद्यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. १३ फेब्रुवारीपासून हे आंदोलन केले जात असून या आंदोलनात आतापर्यंत १० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान आरएसएसने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना फुटीरवादी म्हटल्याने आंदोलक शेतकरी संतापले आहे. तसेच आरएसएसच्या वक्तव्यावरून शेतकरी नेत्यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे.

यावरून पंजाब मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस श्रवणसिंह पंढेर यांनी, आरएसएसच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना, आरएसएसचे हे मत चिंतेची बाब असून 'आरएसएस आता अल्पसंख्याकांची संकल्पना संपवण्याचा विचार करत आहे, असे पंढेर यांनी टीका केली आहे.  पंढेर यांनी ही टीका मंगळवारी (ता. १९) चंदीगड येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी संयुक्त किसान मोर्चाचे (बिगरराजकीय) नेते जगजित सिंग डल्लेवाल उपस्थित होते. 

आरएसएसने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना 'फुटीरतावादी शक्ती' म्हटले होते. तसेच शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या वेळी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा ही आरोप केला होता. यावरून डल्लेवाल यांनी, आरएसएसचे हे वक्तव्य धोकादायक असून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी एकत्र असल्यानेच सत्ताधाऱ्यांना भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. 

बैठका आणि पंचायत सभा

सध्या शहीद शेतकरी शुभकरन सिंह यांच्या अस्थिकलश यात्रा सुरू असून २२ ते ३१ मार्च या कालावधीत हरियाणातील हिस्सार आणि अंबाला जिल्ह्यात मोठी सभा होईल असे डल्लेवाल यांनी म्हटले आहे. तर यूपीमध्ये देखील दोन अस्थिकलश यात्रा सुरू असून संभल, अलिगड आणि सहारनपूरमध्ये किसान पंचायती भरवल्या जाणार आहेत. तर राजस्थानमधील शेतकरी देखील आमच्या लढ्यात सहभागी झाले असून तेथेही ३१ मार्चपर्यंत मोठी सभा आयोजित केली जाईल. तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही डल्लेवाल यांनी म्हटले आहे. 

यादरम्यान २३ मार्चला सरदार भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेश यांच्या हौतात्म्य दिना दिवशी मृत आंदोलक शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल, असेही यावेळी शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT