Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : ऊस दराबाबत साखर कारखानदार, शेतकरी संघटनांच्या बैठकीचे आयोजन

Kolhapur Sugarcane Factories : मागील ऊस दरातील फरक व चालू हंगामातील पहिली उचल प्रतिटन ३ हजार ७०० रुपये मिळावी या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत.

sandeep Shirguppe

Sugarcane Rate Kolhapur : मागील ऊस दरातील फरक व चालू हंगामातील पहिली उचल प्रतिटन ३ हजार ७०० रुपये मिळावी या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या रेट्यामुळे साखर कारखानदार, शेतकरी संघटना यांची बैठक सोमवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ताराराणी सभागृहात ही बैठक घेण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी ऊस दरावरून जोरदार आंदोलन सुरू केले आहे. याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत दराची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये मागील २०२३-२४ या गळीत हंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये अंतिम हप्ता व सध्याचा २०२४-२५ या गळीत हंगामासाठी पहिली उचल प्रतिटन ३ हजार ७०० रुपये मिळावे, अशी मागणी केली आहे.

तोडणीसाठी मजुरांकडून व ऊस तोडणी मशिन मालकांकडून एकरी ५ ते १० हजार रुपयांची मागणी करून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. या सर्व विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी साखर कारखानदार, शेतकरी संघटना प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी केले आहे.

साखर आयुक्तांकडे मागणी

२५ ॲाक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये चालू गळीत हंगामासाठी प्रतिटन पहिल्या उचल जाहीर करावी. चालू गळीत हंगामामध्ये साखर कारखान्यांनी पहिल्या ५० दिवसात कार्यक्षेत्रातीलच ऊस गाळप करावा. पुरामध्ये बाधीत झालेल्या ऊसाची प्राधान्याने पहिल्यांदा तोड करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.

ऊस तोडणी मजूरांची मजूरी वाढूनही व तोडणी वाहतूक एफ. आर. पी मधून कपात करूनही ऊस तोडणीसाठी शेतक-याकडून एकरी ५ ते १० रूपयाची मागणी केली जात आहे. यामुळे अशा पध्दतीने लूट करणाऱ्या संबधित तोडणी वाहतूकदार यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी या मुद्याबाबत स्वाभिनानीने साखर आयुक्त यांना निवेदन दिले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

NCCF Onion Procurement : ‘एनसीसीएफ’कडूनही माहिती देण्यास टाळाटाळ

MahaDBT : महा़डीबीटीकडून पूर्वसंमतीसाठी अडीच हजारांवर शेतकरी प्रतीक्षेत

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Lumpy Skin : खानदेशात ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण प्रक्रिया संथ

SCROLL FOR NEXT