Poultry Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farming : कोंबड्यांतील ताण कमी करण्याचे उपाय

Poultry Business : उच्च तापमान आणि उच्च आर्द्रतेमुळे सर्वात जास्त प्रमाणात कोंबड्यांवर ताण निर्माण होतो. उन्हाळ्यात कोंबड्यांना सकाळी व संध्याकाळी थंड वेळेत खाद्य द्यावे.

Team Agrowon

डॉ. अभिषेक सोनटक्के, डॉ. जी. एम. गादेगांवकर

Poultry Farming Update : उच्च तापमान आणि उच्च आर्द्रतेमुळे सर्वात जास्त प्रमाणात कोंबड्यांवर ताण निर्माण होतो. उन्हाळ्यात कोंबड्यांना सकाळी व संध्याकाळी थंड वेळेत खाद्य द्यावे.

दुपारच्या वेळात कोंबड्यांना खाद्य देऊ नये.उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो.

उन्हाळी हंगामात जनावरे, कोंबड्यांवर उन्हाचा ताण निर्माण होतो, ज्यामुळे त्यांच्यापासून मिळणारे उत्पन्न बाधित होते. उष्माघातामुळे मरतूक देखील दिसून येते.

शारीरिक स्थिती ज्यावेळी शरीर उष्णता उत्पादन आणि शरीरातील उष्णता कमी राखण्यास सक्षम नसते अशावेळी कोंबड्यांना उष्णतेमुळे अधिक ताण दिसून येतो. सभोवतालचे उच्च तापमान आणि उच्च आर्द्रतेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोंबड्यांवर ताण निर्माण होतो.

कोंबड्यांमध्ये ताण निर्माण करणाऱ्या विविध बाबी आहेत. परंतु उष्णतेचा ताण हा प्रमुख घटक आहे. शरीर तापमान नियंत्रित करण्याकरिता कोंबड्या इतर पद्धतीचा वापर करतात. कोंबड्यांचे शारीरिक तापमान हे १०७ फॅरानाइट असते. मनुष्य व इतर प्राण्यांप्रमाणे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी कोंबड्यांना घाम येत नाही, कारण त्यामध्ये घाम ग्रंथी नसतात.

ज्यावेळी शरीर तापमान नियंत्रित करणे आवश्यक असते, अशावेळी कोंबड्या शेडमध्ये वापरलेले बेडींग (गादी) म्हणजेच जामिनावर अंथरलेले तूस हे बाजूला सरकवून जमिनीवर पंख पसरवून बसतात. कोंबड्या पाण्याचे पाइप, पाण्याची भांडी यांना स्पर्श करतात. याद्वारे शरीर थंड होण्यास मदत होते. अशा पद्धतीचा अवलंब करून तापमान नियंत्रित होण्यास मदत होते.

तापमान ३५ सेल्सिअसच्या खाली असल्यास कोंबड्यांना उष्णतेचा ताण अधिक जाणवत नाही, त्या उष्णतेच्या ताणाला सामोरे जात नाहीत. परंतु उन्हाळ्यात तापमान यापेक्षा अधिक वाढते, अशा वेळी शेडमध्ये भरपूर खेळती हवा असणे आवश्यक असते. छत थंड ठेवण्याकरिता छतावर सुक्या चाऱ्याचे आच्छादन करावे. शक्य असल्यास छतावर व पडद्यावर दिवसातून ३ ते ४ वेळेस पाण्याची फवारणी करावी.

कोंबड्या जर शरीराचे तापमान राखण्यास सक्षम नसतील तर त्यांचा श्वासोच्छवासाचा वेग वाढतो. रक्तातील बायकार्बोनेट आयन असलेल्या अल्कलींच्या विकासासाठी जबाबदार असतो. हे आयन रक्ताची कॅल्शिअम वहन क्षमता कमी करतात आणि अंड्यांचा दर्जा कमी करतात. या घटकांचा विचार करता उष्णतेचा ताण हा मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्यास कारणीभूत ठरतो. केवळ उपचारानेच नव्हे, तर उत्तम व्यवस्थापन पद्धतीद्वारे कोंबड्यांची मरतूक कमी करता येते.

आहार व्यवस्थापनात बदल

उन्हाळ्यात कोंबड्यांना सकाळी व संध्याकाळी थंड वेळेत खाद्य द्यावे. दुपारच्या वेळात कोंबड्यांना खाद्य देऊ नये. सकाळच्या वेळेत शरीरात उष्णता उत्पादन २० ते ७० टक्क्यांपेक्षा कमी असते.

खाद्याद्वारे निर्माण होणारी उष्णता थंड वेळेत दोन तासापर्यंत परिणाम दर्शवते, तर वातावरणातील तापमान हे ३५ अंश सेल्सिअस किंवा अधिक असताना हा परिणाम १० तासापर्यंत असतो. म्हणजेच केवळ खाद्य थंड वेळेत दिले तरी आपण ताण बराच कमी करू शकतो.

शेड रचना आणि व्यवस्थापन

कोंबड्यांच्या शेडची रचना पूर्व-पश्चिम असावी. यामुळे शेडमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते. कोंबड्यांना प्रत्यक्ष उन्हापासून संरक्षण मिळते. छतावर पाण्याचे फवारे लावावेत, छत झाकून ठेवावे.

शेडचे छत आणि भिंती पांढऱ्या(चुन्याने)रंगाने रंगवाव्यात. आवश्यक तेवढी जागा पुरवावी,गर्दी टाळावी. कोंबड्यांना खाद्य व पाणी पुरवण्यासाठी योग्य प्रमाणात भांडी वापरावीत. कोंबड्यांना दिवसभर स्वच्छ,ताजे व थंड पाणी पुरवावे. शेडच्या भोवती झाडे लावावीत म्हणजे सावली निर्माण होऊन उष्णतेची तीव्रता कमी होईल.

औषधोपचार

औषधोपचार करत असताना नंतर उपचार करण्याऐवजी कोंबड्यांच्या दैनंदिन खाद्यात जीवनसत्त्व क आणि ई यांचा वापर करावा. जीवनसत्त्व ई चा साधारपणे २५० मि.ग्रॅ.प्रतिकिलो खाद्य आणि जीवनसत्त्व क चा वापर ४०० मि ग्रॅम प्रतिकिलो खाद्य करावा.सोबतच इलेकट्रोलाईटस व डेक्सट्रोज चा वापर अत्यंत आवश्यक आहे.

शारीरिक ऊर्जा एकदम न वाढता ती आवश्यक व संतुलित प्रमाणात सतत असणे आवश्यक आहे.अशावेळी प्रत्यक्ष कर्बोदकांऐवजी फॅटचा उपयोग खाद्यातून करावा. याकरिता वनस्पती तेलाचा खाद्यामध्ये योग्य प्रमाणात अवलंब करावा.

औषधी वनस्पतींचा वापर

उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनसत्त्वांचा पुरवठा होण्याकरिता आवळा व संत्री किंवा इतर लिंबूवर्गीय वनस्पतींचा वापर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात करावा.

संत्री/लिंबू ३०-४० ग्रॅम प्रति १०० कोंबडी या प्रमाणात वापर करावा. उष्णतेचा ताण कमी करण्याकरिता लिंबू किंवा संत्र्याची साल देखील उपयुक्त आहे.

अश्वगंधा,तुळस,मंजिष्ठा,शतावरी यांचा वापर देखील आहारातून करावा. अश्वगंधा- ४ ग्रॅम, तुळस-४ ग्रॅम, मंजिष्ठा-४ ग्रॅम, शतावरी-५ ग्रॅम. या सर्व वनस्पती एकत्र करून खाद्यातून १०० कोंबड्यांसाठी वापराव्यात.

संपर्क - डॉ.अभिषेक सोनटक्के, ७०२०२११४७०, (पशुपोषण आहार विभाग,पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सोयाबीन खरेदीची मुदत निम्मी संपली मात्र २ टक्केही खरेदी नाही; आतापर्यंत केवळ २४ हजार टनांची खरेदी पूर्ण

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी नरमाई ; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर ?

Farmer Producer Company : नवअनंत शेतकरी कंपनीची वाटचाल आशादायी

Maharashtra Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार?

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

SCROLL FOR NEXT