Cotton Disease  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Disease : कापसातील मर संकटात घालेल भर ; वेळीच उपाय करा

Cotton Disease Management : बऱ्याच ठिकाणी झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत यालाच आकस्मिक मर असं म्हणतात.

Team Agrowon

मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी सध्या अतिवृष्टी झालेली आहे. अशा परिस्थितीत अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी कपाशीची झाडे सुकू लागली आहेत. झाडे सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते. हे लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिलेली माहिती पाहुया.

बऱ्याच ठिकाणी झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत यालाच आकस्मिक मर असं म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचं तापमान वाढलेलं असतं. अशावेळी पाणी दिल्यास किंवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकतं आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर ३६ ते ४८ तासांत आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते.

मर रोगाच्या नियंत्रणासाठी शेतातील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा. वापसा येताच कोळपणी आणि खुरपणी करावी. लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया अधिक १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००:००:५० खत )अधिक २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली याप्रमाणे आळवणी करावी. किंवा

१ किलो १३:००:४५ अधिक २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली या प्रमाणात आळवणी करावी. या द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.

लक्षात ठेवा सा सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढे होणारं मोठं नुकसान वेळीच टाळता येईल.

------------

माहिती आणि संशोधन- कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

संपर्क - ☎ ०२४५२-२२९०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HTBT Cotton: ‘एचटीबीटी’ कापसावरील बंदी उठविली जाणार?

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत बदल अशक्य : कोकाटे

Nagpur Market Scam: नागपूर बाजार समितीतील घोटाळ्याची ‘लाचलुचपत’मार्फत चौकशी

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेला राज्यात थंडा प्रतिसाद

Vidarbha Rain Forecast: विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT