Forest Fire  Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Fire : रामशेजसह, सुळा डोंगरावर वणव्यामुळे वनसंपदेची मोठी हानी

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यातील पश्चिम पटट्यातील मातोरी गावालगतच्या सुळा डोंगरास (Mountain) व ऐतहासिक रामशेज किल्ल्याच्या उत्तरेस माथ्यावर गुरुवारी (ता. १६) दुपारी वणवा लागल्याने वनसंपदेची मोठी हानी झाली. त्यामुळे जैवविविधता धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

या वेळी पर्यावरणप्रेमी, दुर्गप्रेमी व वन विभागाने मोठ्या कष्टाने हे दोन्ही वणवे (Fire) विझवले; मात्र आगीचे लोट व धूर यामुळे आग नियंत्रणात (fire control) आणण्यात मदतकार्य करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना अडथळा आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

गेली अनेक वर्षे या दोन्ही ठिकाणी वणवा लागत आहे. मातोरी गावाचा सुळा डोंगर व ऐतिहासिक रामशेज किल्ल्याच्या उत्तरेस आग लागल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे यांनी वन विभागास माहिती दिली.

यापूर्वी तातडीने भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे, लक्ष्मन लोखंडे, नामदेव लोखंडे वन विभागाचे ओमकार देशपांडे, साहेबराव महाजन, प्रवीण गोलावीत यांनी प्रयत्नांची शिकस्त करून सुळा वनक्षेत्रातील वणवा आटोक्यात आणला.

दुपारच्या सत्रात रामशेजची आग वन विभागाचे स्थानिक वनरक्षक व वन देखपाल, प्लॉटधारक यांनी वणवा विझवला.

वणवे सातत्याने लागत आहेत. वणवा लावणारे मोकाट असल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत स्थानिक वनव्यवस्थापन समित्या, ग्रामपंचायतींनी रीतसर तक्रारी दाखल कराव्यात, वन विभागाने वणवा लागण्याच्या घटनांचा शोध लावावा.

कागदोपत्री असलेल्या वन व्यवस्थापन समित्यांना वणवा विझवण्याचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी शिवकार्य गडकोट संस्था, दरीआई माता पर्यावरण, वृक्षवल्ली फाउंडेशनने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT