Wayanad Landslide Agrowon
ॲग्रो विशेष

Wayanad Landslide : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, २६ जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केरळमध्ये पावसांने थैमान घातला असून पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यादरम्यान येथील वायनाडमध्ये मंगळवारी (ता.३०) पहाटे भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली. यात शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यावरून केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (केएसडीएमए) म्हटले आहे की, बाधित भागात अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच एनडीआरएफची आणखी एक टीम वायनाडमध्ये पोहोचली असून हवाई दलाची दोन हेलिकॉप्टरही घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. सध्या युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वायनाडमधील चूराल्लमाला, मुंडक्काई, अट्टामाला गावात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. पहिली घटना दोनच्या सुमारास आणि दुसरी घटना पहाटे ४.१० वाजता कोसळली. येथे तीन भूस्खलनाचा घटना घटना झाल्या असून यात १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे बोलले जात आहे. तर २६ जणांचे मृत्यू देख बचाव पथकाने बाहेर काढले आहेत. तर १६ जखमींना मेपाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

आपत्कालीन क्रमांक जारी 

आरोग्य विभागाने येथे एक नियंत्रण कक्ष सुरू करत आपत्कालीन फोन नंबर ९६५६९३८६८९ आणि ८०८६०१०८३३ जारी केले आहेत. तसेच केरळमधील व्यथिरी, कलपट्टा, मेप्पडी आणि मनंथवाडीमधील सर्व रूग्णालये आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. यादरम्यान आरोग्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना रात्रीच सेवेवर हजर होण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

वायनाडमध्ये झालेल्या दुर्घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केले आहे. मोदींनी वायनाडच्या काही भागात भूस्खलनामुळे जीवित हानी झाली. त्यावरून आपण व्यथित झाल्याचं म्हटले आहे. तसेच ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्या सर्वांसोबत आपल्या सहवेदना आहेत. मी जखमींसाठी प्रार्थना करत आहे. सर्व बाधितांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू असून मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली आहे. तसेच वायनाडमधील सद्यस्थिती पाहता केंद्राकडून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे मोदी म्हणाले. तसेच भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना भाजप कार्यकर्त्यांना मदत कार्यात सर्वतोपरी मदत करावी अशी सूचना देण्यास सांगितल्याचेही मोदी म्हणाले. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. 

राहुल गांधी यांनी व्यक्त केले दु:ख

वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी दुर्घटनेनंतर समाजमाध्यावर पोस्ट करताना, वायनाडमधील मेप्पडीजवळ झालेल्या भूस्खलनाने मला खूप दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना. मला आशा आहे की जे अजूनही अडकले आहेत त्यांची लवकरच सुखरूप सुटका होईल अशी आशा व्यक्त करत असल्याचे म्हटले आहे. तसेच केरळचे मुख्यमंत्री आणि वायनाडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून मला बचाव कार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मी त्यांना सर्व यंत्रणांशी समन्वय साधून सर्व प्रकारची मदत देण्याची विनंती केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील वायनाडच्या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

SCROLL FOR NEXT