Karul Ghat landslide And Rajaram Bandhara : करूळ घाटात दरडं कोसळली; राजाराम बंधारा पाण्याखाली गेला

Rajaram Bandhara under water : गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांची पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Karul Ghat And Rajaram Bandhara
Karul Ghat And Rajaram BandharaAgrowon
Published on
Updated on

Pune News : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर आहे. यामुळे शेतीची कामे रखडली आहेत. मात्र जिल्ह्यातील धरण पाणलोटक्षेत्रात धुवाँधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणासह, नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात झालेल्या पावसामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी आणि तेरवाड येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील करूळ घाटात दरडी कोसळ्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत असून प्रवशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यंदा मॉन्सून वेळेवर दाखल झाला असला तरी जिल्ह्यातील सर्वच भागात दमदार पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे भातपेरणी झाली असली तरिही दमदार पावसाची प्रतिक्षा बळीराजाला लागेली आहे. मात्र जिल्ह्यातील धरण क्षेत्रात दमदार पावासाची हजेरी असून धरणासह नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

Karul Ghat And Rajaram Bandhara
Anuskura Ghat Landslide : अणुस्कुरा घाटात कोसळली दरड, तब्बल १५ तासांहून अधिक काळ वाहतूक मार्ग बंद

राधागनरी धरणाची पाणीपातळी

यंदा राधागनरी धरणाची पाणीपातळी २ टीएमसीवर गेली होती. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसह शहर वाशियांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र आता धरण पाणलोटक्षेत्रात गेल्या २४ तासात ८० मीमी धुवाँधार पाऊस झाला आहे. त्यामुळे राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर सध्या धरणातून वीजनिर्मितीसाठी ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून दोन फूटांची वाढ झाली आहे.

राजाराम बंधारा पाण्याखाली

तर पहिल्याच पावसात कसबा बावडा येथील नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. गेल्या २४ तासात झालेल्या पावसामुळे शनिवारी सकाळी पाणी पातळी १४ फूट ३ इंच होती. तर आज १७ फूट ७ इंच झाली आहे. सध्या राजाराम बंधाऱ्यावरून नदीचे पाणी जात असल्याने पोलिसांनी राजाराम बंधारा वाहतुकीसाठी बंद केला आहे.

Karul Ghat And Rajaram Bandhara
Panchaganga River : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी गांभिर्य कोणालाच नाही? पाहणीवेळी अधिकारीच अनुपस्थित

करूळ घाटात दरडी कोसळल्या

दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या गगनबावड्यात देखील जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे येथील करूळ घाटात विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. ज्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे.

बेड १०० मीटर खोल दरीत गेला

तर घाटाच्या नूतनीकरणाच्या कामाला काहीच महिन्यांपूर्वी सुरूवात झाली आहे. घाटावर तब्बल अडीचशे कोटी रुपये खर्च केले जात आहेत. यादरम्यान पहिल्याच पावसात कामाचा निकृष्ट दर्जाचा पोलखोल झाली आहे. येथे पहिल्याच पावसात सिमेंट काँक्रिटचा बेड १०० मीटर खोल दरीत कोसळला. यावेळी कोणतीच वाहतूक सुरू नसल्याने सुदैवाने जीवित हाणी टळली.

ठेकेदाराकडून सूचनांना हरताळ

स्थानिक आमदार नितेश राणे आणि प्रशासनाने ठेकेदाराला काम संपवण्यासह दर्जेदार कामाच्या सूचना केल्या होत्या. मात्र ठेकेदारानं या सूचनांना हरताळ फासत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आमदार राणे याकडे लक्ष देणार का? असा सवाल स्थानिकांसह प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com