Wheat Crop Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Crop Fire : अकोटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे दोन एकर गहू जळून खाक

Crop Loss : शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा ऑटोकाट प्रयत्न केला मात्र गव्हाचे संपूर्ण पीक आगीत जळाले. डिगांबर ठाकरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत.

Team Agrowon

Akola News : अकोट तालुक्यातील रुईखेड येथे डिगांबर ठाकरे यांच्या शेतातील दोन एकरातील गव्हाचे पीक जळून खाक झाले. यात मोठे नुकसान झाले असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जाते.

रुईखेड शेत शिवारात गट नंबर ५९ मध्ये ठाकरे यांनी यंदा गव्हाची लागवड केली होती. हे पीक कापणीला आले असताना ही दुर्घटना घडली.

बाजूला असलेले केळीचे पीकसुद्धा भाजले गेले. शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा ऑटोकाट प्रयत्न केला मात्र गव्हाचे संपूर्ण पीक आगीत जळाले. डिगांबर ठाकरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत.

सोंगणीला आलेला गहू जळाल्याने त्यांचे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. मंगळवारी (ता. २५) महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून वरिष्ठांना या बाबत अहवाल सादर केला.

रुईखेड शेत शिवारात गट क्रमांक ५९ मध्ये माझ्या शेतात मी दोन एकरात गहू पिकाची लागवड केली होती. पीक कापणीला आले होते. अचानक आग लागल्याने संपूर्ण पीक जळाले. अंदाजे दोन लाख रुपयांचे यात नुकसान झाले. संबंधित विभागाने आपणास आर्थिक मदत द्यावी.
- डिगांबर ठाकरे, नुकसानग्रस्त शेतकरी, रुईखेड जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT