Masalaga Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Water Project : मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला पडली भेग

Team Agrowon

Latur News : मसलगा (ता. निलंगा) येथील मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दीडशे फूट लांबीची भेग पडल्याने एकच खळबळ उडाली असून, यामुळे प्रकल्प फुटेल या भीतीने परिसरातील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शुक्रवारी (ता. ६) सहा गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

नव्वद टक्के असलेला पाणीसाठा कमी करण्याची वेळ प्रशासनावर आली असून, याबाबतची चौकशी करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मसलगा मध्यम प्रकल्प आठ दिवसांपूर्वी शंभर टक्के भरला होता.

प्रकल्पाने धोक्याची पातळी ओलांडली होती; मात्र प्रशासन गंभीर नव्हते. त्यातच तेथील शेतकऱ्यांनी ओहरफ्लो प्रकल्प झाल्याचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल केल्यानंतर प्रकल्प प्रशासनाने दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता.

ही घटना ताजी असतानाच मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दीडशे फुटांची लांब भेग पडली असून रुंदी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत येथील शेतकरी तुळशीदास साळुंके यांच्या निदर्शनास चार दिवसांपूर्वी मोठी भेग आली होती. त्या दिवशी भेगेची रुंदी चार इंच इथपर्यंत होती.

मात्र तीच भेग चार दिवसांनंतर पाहिली असता चार इंचावरून दहा इंचापर्यंत वाढल्याने भीती निर्माण झाली आहे. ही बाब त्यांनी प्रशासनाला कळविली प्रकल्पाला भेग पडल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच तलाव फुटेल या भीतीने ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अमरसिंह पाटील, कार्यकारी अभियंता श्री. पवार, उपअभियंता अजय जोजारे यांनी पाहणी करून तातडीने पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय घेऊन प्रकल्पाचे सहा दरवाजे १० सेंटिमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. प्रकल्पातून ६० टक्क्यांपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते.

रोजंदारी कामगारावर देखरेखीचा कार्यभार

मुळात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने असा प्रकार घडत आहे. येथील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यापासून रोजंदारीवरील कामगार देखरेख करत आहेत. अनेक गावांची तहान भागवणारा एवढा मोठा प्रकल्पाची काळजी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गतवर्षी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. आता पाणी सोडून दिल्यानंतर उन्हाळ्यात पाणी पाणी म्हणण्याची वेळ येईल अशीही तीव्र भावना येथील नागरिकांनी बोलून दाखवली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT