Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Mamadapur Water Project : दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवल्यातील उत्तर-पूर्व भागाला जलसंजीवनी देण्यासाठी ममदापूर व देवना साठवण तलाव हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत.
Dudhana Water Project
Dudhana Water ProjectAgrowon
Published on
Updated on

Nashik News : दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवल्यातील उत्तर-पूर्व भागाला जलसंजीवनी देण्यासाठी ममदापूर व देवना साठवण तलाव हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचे काम एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करावे, पुढील काळात येवला हा दुष्काळी नाही, तर सुकाळी तालुका म्हणून ओळखला जाईल, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

भुजबळ यांच्या हस्ते रविवारी (ता. ६) ममदापूर व देवदरी येथे साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जलसंधारण विभागाचे सहसचिव हरिभाऊ गीते, राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, मच्छिंद्र थोरात, दत्तात्रय वैद्य, सयाजी गुडघे, संपत वाघ, दत्तू वाघ आदी उपस्थित होते.

Dudhana Water Project
Water Project : मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला पडली भेग

भुजबळ म्हणाले, की ममदापूर मेळाचा बंधारा हा प्रकल्प १५ कोटी ७४ लाखांच्या निधीतून साकारण्यात येत आहे. मेळाचा साठवण बंधारा हा २८.०६ हेक्टर वनजमिनीवर होणार असून, तलावाचे पाणलोट क्षेत्र १८ चौरस किलोमीटर आणि एकूण क्षमता ही ३५.६७ द.ल.घ.फू असणार आहे.

या धरणाची लांबी २२० मीटर तर सांडव्याची लांबी ही ७९ मीटर प्रस्तावित आहे. बंधाऱ्यामुळे ममदापूर परिसरातील जमीन ओलिताखाली येणार असून, शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. साठवण तलावाचा ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील वन्य जीव आणि प्राण्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Dudhana Water Project
Jayakwadi Water Project : ‘जायकवाडी’तील विसर्ग वाढवला

देवना तलाव १५ कोटी ६५ लाखांच्या निधीतून साकारला जात आहे. देवना तलाव ही येवला तालुक्यात खरवंडी व देवदरी गावाजवळ दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर असून, येवला तालुक्यातील देवदरी, खरवंडी, राहडी, कोळम खुर्द या गावांच्या शिवारातील शेतीस उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे वन्य प्राण्यांच्या पिण्यासाठी व रोपवाटिकेसही लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून २.०८ दलघमी म्हणजेच ७३.४४ दलघफू पाणी वापरासाठी पाणी उपलब्धता उपलब्ध होणार आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

लवकरच घराघरांत नळाद्वारे पाणी

अडतीस गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, लासलगाव-विंचूरसह १६ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. आता राजापूरसह ४१ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगावसह १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यासह जलजीवन मिशनअंतर्गत विविध पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यात येत आहेत. या पाणी योजनांचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच मतदार संघातील १०० टक्के नागरिकांना आपल्या घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, असे मंत्री भुजबळ यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com