Bail Pola  Agrowon
ॲग्रो विशेष

Bail Pola 2023 : भाद्रपद पोळ्यानिमित्त सजावटीच्या साहित्याने बाजार सजला

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : भाद्रपद बैलपोळ्यानिमित्त येथील रविवारचा (ता. ८) आठवडे बाजार बैलांच्या सजावटीच्या साहित्याने सजला होता. सध्या पोळ्याच्या निमित्ताने बाजारात विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आले आहे.

साहित्यात वेसण, दोर, माळ, चौरंग, बेडगी, रंग, गुलाल, मठाठी, मोरकीचा आदींचा समावेश आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यांसोबत राबलेल्या बैलांच्या प्रति कृतज्ञता भावना म्हणून बैलपोळा साजरा केला जातो.

बैलांना रंगरंगोटी व सजावट करून त्यांची पारंपरिक वाद्यांसह वाजतगाजत गावातून मिरवणूक काढली जाते. गावातील देवाचे दर्शन घडविले जाते. बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला घालण्याची संस्कृती आहे.

काही वर्षांत शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने बैलांची संख्या कमी होत आहे. त्यातच बैलांच्या सजावटीच्या साहित्याच्या दरातही ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : राज्यात सोयाबीन, मुग आणि उडदाची २०९ केंद्रावर केली जाणार हमीभावाने खरेदी 

Gokul Dudh Sangh : गोकुळची दुग्ध उत्पादने थेट परदेशात, पूर्व युरोपच्या अझरबैजान देशाला बटर पुरवठा

Rabi Season 2024 : बाजरी, कंदा लागवड घटणार; मका, तेलबिया पिकांकडे कल

Agriculture Award : दहा शेतकरी, दोन कर्मचाऱ्यांचा राज्य कृषी पुरस्काराने सन्मान

Water Scheme : जिल्हा परिषदेच्या पाणी योजना रखडल्या

SCROLL FOR NEXT