Bamboo Expo Agrowon
ॲग्रो विशेष

Jalna Bamboo Expo : बाजार समितीमार्फत बांबू खरेदी, विक्री केंद्र सुरू करणार

Bamboo Products : वाढते तापमान कमी करण्यासाठी वृक्ष एकमेव पर्याय. त्यापैकी बांबू वृक्ष सर्वात परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व व उपयोगिता सर्वांनी जाणून घ्यायला हवी.

Team Agrowon

Jalna News : बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासह बांबूला बाजारपेठ मिळावी, या हेतूने जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत बांबू खरेदी- विक्री केंद्र सुरू करण्यात येईल, अशी घोषणा बाजार समितीचे सभापती तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली.

रानउद्योग फार्मर प्रोड्युसर कंपनी, जालना आणि वेणूवेध बांबू संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ एप्रिल या कालावधीत आयोजित मराठवाड्यातील पहिल्या पर्यावरणपूरक तीन दिवसीय बांबू वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे उद्घाटन मंठा रोडवरील महेश भवनात शुक्रवारी (ता. ११) आय. सी. टी. मुंबईचे कुलपती पद्मभूषण प्रोफेसर जे. बी. जोशी यांच्या हस्ते झाले.

त्याप्रसंगी आ. खोतकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आय. सी. टी. मुंबईचे कुलगुरू प्रो. ए. के. पंडित, महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आयसीटीच्या मराठवाडा कॅम्पसचे डायरेक्टर प्रो. एस. टी. म्हस्के, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, विनोदराय इंजिनिअरिंगचे डायरेक्टर सुनीलभाई रायठठ्ठा, आयसीटी जालनाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. आर. पी. नेमाडे, वेणूवेध बांबू संशोधन संस्था पुणेचे डॉ. हेमंत बेडेकर, संचालक संजीव करपे, विजय दाड, डॉ. सुयोग कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

श्री. पटेल म्हणाले, की वाढते तापमान कमी करण्यासाठी वृक्ष एकमेव पर्याय. त्यापैकी बांबू वृक्ष सर्वात परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व व उपयोगिता सर्वांनी जाणून घ्यायला हवी. बाबू लागवडीत जालना हा महाराष्ट्राचा दिशादर्शक जिल्हा ठरावा यासाठी १० हजार एकरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

स्टील सिटी, बियाणे सिटी अशी ओळख असलेला जालना यापुढे बांबू लागवडीसाठी ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रदर्शनात बांबूचे फर्निचर, शोपीस, हँडक्राफ्टेड उत्पादने, दागिने, भांडी, हँडबॅग्ज, टॉवेल, घड्याळ, टूथब्रश आदी १२०० पेक्षा अधिक वस्तु आहेत.

४ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद

मनरेगा योजनेअंतर्गत बांबू लागवडीसाठी लागेल, तेवढा पैसा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. अर्थसंकल्पात बाबू लागवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन पाशा पटेल यांनी केले. जूनपासून लातूर येथे पहिले बांबू विद्यापीठ सुरू होत, असल्याची माहिती त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT