
Satara News : राज्य सरकारने बांबू लागवड अभियान मनरेगाअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड केली होती. यानंतर अभियानाला गती मिळाली असून, जिल्ह्यात सध्या एक हजार ७४५.४३ हेक्टरवर सहा लाख २२ हजार १८४ रोपे लावली आहेत. त्यामुळे बांबू लागवड योजनेत सातारा जिल्हा अग्रेसर असून, उद्दिष्टपूर्तीसाठी अनेक ठिकाणी प्रत्यक्षात लागवडीचे काम सुरू झाले आहे.
बांबू लागवड अभियानांतर्गत जिल्ह्यास ११०१०.०६ हेक्टरचे उद्दिष्ट दिल्यानंतर ग्रामपंचायत विभागास सात हजार ७२० हेक्टर, सामाजिक वनीकरण ४२०.०६ हेक्टर आणि कृषी विभागास दोन हजार ८७० हेक्टर असे उद्दिष्ट वाटप आले. प्रत्येक ग्रामसेवक व कृषी सहायकांना किमान १० एकर बांबू लागवडीचे उद्दिष्ट दिले.
त्यानुसार तालुकास्तरावर अधिकारी, कर्मचारी यांनी गावांमध्ये भेटी देऊन जनजागृती केली बांबूची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मनरेगाअंतर्गत प्रोत्साहन देऊन जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावरून पाठपुरावा केला जात आहे. त्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बांबू लागवड अभियान गतीने सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामपंचायत विभागामार्फत वैयक्तिक क्षेत्रावरील एक हजार १२९.२२ हेक्टरवर सद्यःस्थितीत कामे सुरू केली आहेत.
सामाजिक वनीकरण विभागामार्फत मनरेगांतर्गत २४.६६ हेक्टरवर, तर कृषी विभागामार्फत मनरेगाअंतर्गत सद्य:स्थितीत ६१२.२८ हेक्टरवर ७६८ लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष लागवड करण्याचे काम सुरू केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
शासकीय विभागास सार्वजनिक ठिकाणी, वनक्षेत्रे, नदीकाठी, रस्त्याच्या दुतर्फा, पाणीसाठ्याच्या चारीबाजूस जास्तीतजास्त बांबू लागवड करावी, तसेच मनरेगाअंतर्गत जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करून शासकीय योजनेचा लाभ घेऊन बांबू लागवड माध्यमातून शेतीपूरक व्यवसायातून अधिक स्थिरतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
११ हजार २५८ प्रस्तावांना मंजुरी
जिल्ह्यात एकूण नऊ हजार २४१.६९ हेक्टरसाठी १४ हजार ६०३ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी सात हजार १९.३४ हेक्टरसाठी ११ हजार २५८ प्रस्तावांना मंजुरी मिळाली, तर एक हजार ९२३.१६ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.