Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : मराठा क्रांती महामोर्चाचा आक्रमक पवित्रा; आजपासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू

Maratha Kranti Mahamorcha : मराठा आरक्षणासाठी जालन्यात सुरू असलेल्या उपोषणातील आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीचार घटनेच्या निषेधाचे पडसाद आता राज्यभर उमटले आहेत. मराठा क्रांती महामोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला असून आजपासून मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे.

Swapnil Shinde

Maratha Community Protest : मराठा आरक्षणाच्या मागणासाठी जालन्यात मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले असून त्यांनी राज्यभरात रास्तारोको, बंद पुकारला आहे. दरम्यान, आज मराठा क्रांती महामोर्चाच्यावतीने मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीचार्ज घटनेच्या निषेधाचे पडसाद आता राज्यभरात तीव्र उमटले आहेत. सकल मराठा समाज मराठा क्रांती महामोर्चा मुंबईने आक्रमक पवित्रा घेत आरक्षणाची मागणी करीत मंगळवार, ५ सप्टेंबरपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण पुकारले आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे.

दुसरीकडे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असून त्याला राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. तसेच ठिकठिकाणी आंदोलन आणि बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. आज राज्य सरकारच्यावतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुमरे, अतुल सावे आणि उदयनराजे भोसले यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Alampatti Dam: कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : मुख्यमंत्री

Ajit Pawar: विनंती करतो, जनतेला हेलपाटे मारण्यास लावू नका: अजित पवार

Indian Politics: देशात पैसा, तंत्रज्ञान भरपूर; पण कमतरता इमानदारांची: नितीन गडकरी

Gorakshak Terror: गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?

Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा अर्जासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT